आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahela Jayavardhane News In Marathi, Sri Lanka, Pakistan, Divya Marathi

श्रीलंकेची महेला जयवर्धनेला विजयी भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो - रंगना हेराथच्या जादुई फिरकीच्या बळावर श्रीलंका संघाने सोमवारी पाकिस्तानचा दुस-या कसोटीत 105 धावांनी पराभव केला. या विजयासह 2 सामन्यांची मालिकाही 2-0 ने जिंकली. निवृत्ती घेतलेल्या माजी कर्णधार महेला जयवर्धनेला विजयी निरोप दिला. सहका-यांनी त्याला खांद्यावर घेऊन मैदानाला फेरी मारली. त्याची ही शेवटची कसोटी होती.

शेवटच्या दिवशी खेळ सुरू झाला तेव्हा श्रीलंकेला 3 बळी हवे होते. पाकिस्तानला 144 धावा काढायच्या होत्या. पाकला ऑलआऊट करून लंकेने सामना खिशात घातला. 14 बळी टिपणा-या फिरकीपटू हेराथला सामनावीर किताब मिळाला. त्यालाच मालिकावीरही निवडण्यात आले. श्रीलंकेने पहिला सामना 7 गड्यांनी जिंकला होता.

श्रीलंकेने पाकिस्तानसमोर विजयासाठी 271 धावांचे आव्हान ठेवले होते. पाहुण्यांनी सोमवारी 7 बाद 127 वरून फलंदाजी सुरू केली. लंकेचा विजय रविवारीच निश्चित झाला होता. सोमवारी एका तासात त्यांनी औपचारिकता पूर्ण केली. पहिल्या डावातील शतकवीर सर्फराज अहमदने दुस-या डावातही सर्वाधिक 55 धावा काढल्या. डोक्यात मार लागल्यामुळे जुनैद खान फलंदाजीला आला नाही.