Home | Sports | From The Field | mahela jayawardene missed his 10 thousand run

... 'त्‍या' धावेमुळे जयवर्धने ठरला कमनशिबी

वृत्तसंस्था | Update - Dec 19, 2011, 01:09 PM IST

दक्षिण अफ्रिकेविरूद्ध खेळण्‍यात आलेल्‍या पहिल्‍या कसोटी सामन्‍यातील दुस-या डावात जर त्‍याने 16 धावा केल्‍या असत्‍या तर तो दसहजारी मनसबदार ठरला असता.

  • mahela jayawardene missed his 10 thousand run

    सेंच्‍युरियन- एखादा फलंदाज जर शतक करण्‍यापूर्वीच 99 धावांवर बाद झाला तर त्‍याच्‍याइतके दुर्दैवी कोणी नाही, असे म्‍हटले जाते. पंरतु, श्रीलंकेचा क्रिकेटपटू महेला जयवर्धने आपल्‍या करिअरच्‍या 10 हजार धावा पूर्ण करण्‍यापूर्वीच बाद झाला. जयवर्धनेने 126 कसोटी सामन्‍यांतील 209 डावांमध्‍ये 9999 धावा बनवल्‍या आहेत.
    दक्षिण अफ्रिकेविरूद्ध खेळण्‍यात आलेल्‍या पहिल्‍या कसोटी सामन्‍यातील दुस-या डावात जर त्‍याने 16 धावा केल्‍या असत्‍या तर तो दसहजारी मनसबदार ठरला असता. परंतु, दुर्दैवाने तो 15 धावांवरच धावबाद झाला. जयवर्धनेने पहिल्‍या डावात 30 धावा बनवल्‍या होत्‍या.
    कसोटी सामन्‍यात आतापर्यंत फक्‍त आठ फलंदाजांनी 10 हजार धावा केल्‍या आहेत. पण आजपर्यंत यापैकी कोणीही हा टप्‍पा पार करण्‍यापूर्वीच धावबाद झालेला नाही. जयवर्धनेने 16 वी धाव घेतली असती तर तो 10 हजार धावा पूर्ण करणारा पहिला श्रीलंकेचा फलंदाज ठरला असता. कदाचित त्‍याच्‍या डोक्‍यात त्‍यावेळेस हाच विचार असेल आणि यामुळेच तो धावबाद झाला असेल, असे तज्‍ज्ञांना वाटते.

Trending