आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahela Jayawardene Retires From Test Cricket Pics

नवशिख्‍यापासून ते निवृत्‍तीपर्यंत असे दिसत होते हे दिग्‍गज कसोटीपटू, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - महेला जयवर्धने, श्रीलंका)
श्रीलंकेचा दिग्‍गज क्रिकेटपटू महेला जयवर्धनेने कसोटी क्रिकेटमधून निवृत्‍ती घेतली आहे. कसोटी क्रिकेटमध्‍ये सर्वांधीक धावा बनविणा-या खेळाडूंमध्‍ये तो सातव्‍या स्‍थानी आहे. जयवर्धनेने आपली शेवटची कसोटी पाकिस्‍तानविरुध्‍द खेळली त्‍यामध्‍ये त्‍याने अर्धशतक ठोकले.
50 वे अर्धशतक लगावल्‍यानंतर झाला OUT
महेलाने शेवटच्‍या कसोटीमध्‍ये 54 धावांची खेळी केली. हे त्‍याच्‍या करिअरमध्‍ये 50 वे अर्धशतक होते. अर्धशतकाचे अर्धशकत करणारा तो जगातील दहावा आणि श्रीलंकेचा दुसरा फलंदाज आहे.
जयवर्धनेने आपल्‍या करिअरमध्‍ये खेळलेल्‍या 149 कसोटी सामन्‍यातील 252 पारींमध्‍ये 49.84 च्‍या सरासरीने 11814 धावा केल्‍या. ज्‍यामध्‍ये 34 शतके आणि 50 अर्धशतकांचा समावेश आहे.
वयोमानाने अनुभवाने ज्‍यांच्‍या खेळाला आकार आला, ज्‍यांचा आलेख उत्‍तरोत्‍तर उंचावत गेला अशांमध्‍ये जयवर्धनेचा समावेश होतो. 30 वा वाढदिवस साजरा केल्‍यानंतर त्‍याचा खेळ अधिक फुलला, बहरला. वयाच्‍या 30 शी नंतर 18 शतके लगावली.
जयवर्धनेच्‍या निवृत्‍तीदिनी आज आम्‍ही तुम्‍हाला जगभरातील दिग्‍गज कसोटीपटूंचे पदार्पनातील आणि निवृत्‍तीचे फोटो दाखविणार आहोत.
पुढील स्‍लाइडवर पाहा, छायाचित्रे..