आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेला जयवर्धनेचे श्रीलंका कसोटी संघात पुनरागमन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो - माजी कर्णधार महेला जयवर्धनेने श्रीलंकेच्या कसोटी संघात दमदार पुनरागमन केले. श्रीलंका आणि पाकिस्तान क्रिकेट संघ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेने नव्या वर्षाला सुरुवात करणार आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीला 31 डिसेंबर रोजी अबुधाबी येथे प्रारंभ होईल.
कसोटी मालिकेसाठी सोमवारी श्रीलंका संघ जाहीर करण्यात आला. या 16 सदस्यीय संघात फर्नांडोची निवड करण्यात आली.
श्रीलंका संघ : ए. मॅथ्यूज (कर्णधार), दिनेश रामदीन, डी. करुणारत्ने, कौशल सिल्वा, कुमार संगकारा, लाहिरू थिरीमाने, महेला जयवर्धने, प्रसन्ना जयवर्धने, नुवान कुलशेखरा, एस. लकमल, शमिंदा एरंगा, व्ही. फर्नांडो, सचित्र सेनानायके, नुवान प्रदीप, रंगना हेराथ, डी. परेरा.