नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार
महेंद्र सिंह धोनी विश्वचषकापूर्वी तणाव दूर करण्यासाठी इशांत, भुवी, मोहित यांना घेऊन अॅडिलेड पासून काही अंतरावर असलेल्या अॅडव्हेंचर पार्कमध्ये 'ट्रॅकिंग आणि फिशिंग' करण्यासाठी गेला आहे. भारतीय संघातील या प्रमुख गोलंदाजांना फिजिकल फिट ठेवण्यासाठी धोनी विशेष प्रशिक्षण देणार आहे.
भारतीय गोलंदाजांनी पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर पडत विश्वचषकातील भारत-पाक सामन्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी धोनीेने ही योजना आखली आहे.
अन्य काही खेळाडू
आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले आहेत. धोनी, भुवी, इशांत आणि मोहित अॅडिलेडपासुन 150 किमी अंतरावर असलेल्या मानवनिर्मित 'अॅडवेंचर स्पोर्ट पार्क' येथे गेले आहेत. ते दोन दिवस तेथेच राहणार असून पाच फेब्रुवारी रोजी हॉटेलमध्ये परतणार आहेत. असे बीसीसीआच्या एका वरिष्ठ अधिका-यांने सांगितले आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, टीम इंडियाचे खेळाडू कशी घालवतात सुटी..