आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोण आहे ही व्‍यक्‍ती? ज्‍याच्‍या खाणपाणाचा, प्रवासाचा खर्च उचलतो धोनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: रामबाबूसोबत बोलताना महेंद्र सिंह धोनी)
क्रिकेटप्रेमींसाठी क्रिकेटर म्‍हणजे देवासमान असतात. क्रिकेटपटूंना पाहण्‍यासाठी, त्‍यांची नक्‍कल करण्‍यासाठी सर्वच चाहत्‍याचा प्रयत्‍न असतो. मात्र क्रिकेटपटूच आपल्‍या चाहत्‍यांचे चाहते झाल्‍याचे एैकिवात नाही. परंतु आपल्‍या चाहत्‍यांच्‍या आपल्‍यावरील प्रेमापोटी धोनीने त्‍याचा राहण्‍याखाण्‍याचा, प्रवासाचा सर्व खर्च उचलला आहे.
हरियाणाचे रहिवासी असलेले रामबाबू लहानपणी पंजासाठी जिल्‍हास्‍तरीय क्रिकेट खेळला आहे. परंतु वडिलांच्‍या अकाली निधनाने आणि परिवाराची संपर्ण जबाबदारी खेळाण्‍याच्‍या, बागडण्‍याच्‍या वयात त्‍यांच्‍यावर आल्‍याने त्‍यांनी एक खासगी नोकरी पत्‍करली. अशा अवस्‍थेतही त्‍याचे क्रिकेटवरील प्रेम तसूभरही कमी झाले नाही. तो धोनीचा चाहता आहे. धोनीप्रमाणेच हेअरस्‍टाईल ठेवतो.
2014 च्‍या विश्‍वचषकाचा अंतीम सामना बांगलादेशमध्‍ये सुरु असताना रामबाबू तापाने फणफणले होते. धोनीला हे माहित पडताच भारतीय संघाच्‍या डॉक्‍टरांकडून त्‍याने रामबाबूची तपासणी केली होती. प्रकृतीत फरक जाणवत नसल्‍याने धोनीने त्‍याला तात्‍काळ विमानाने घरी आणून सोडले होते. असे रामबाबूने सांगितले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, छायाचित्रे...