दारु कंपन्यांच्या जाहिरातीत / दारु कंपन्यांच्या जाहिरातीत हरभजन विरुद्ध धोनी

वृत्तसंस्था

Jul 18,2011 04:00:40 PM IST

नवी दिल्ली - भारतीय संघातील दिग्गज खेळाडू महेंद्रसिंह धोनी आणि हरभजन सिंग यांच्यात चांगली मैत्री असली तरी दारुच्या कंपन्यांनी यांना एकमेकांविरुद्ध आणले आहे.

हरभजन सिंगने यूवी स्पिरिट्सचे चेअरमन विजय मल्या यांना आपल्या वकिलामार्फत नोटीस पाठविली आहे. या नोटीसमध्ये हरभजनने म्हटले आहे की, मॅक्डोवेल्स नंबर वन प्लॅटिनम सोडाच्या जाहिरातीत माझ्या कुटुंबाचा आणि शीख समुदायाची चेष्टा करण्यात आली आहे. मॅक्डोवेल्सच्या जाहिरातीत धोनी मुख्य भूमिकेत आहे.

हरभजनने पेरनोड रिकाडर्सच्या रॉयल स्टॅग या ब्रँडच्या जाहीरातीत काम केले आहे. मॅक्डोवेल आणि रॉयल स्टॅग या दोन कंपन्या एकमेकांच्या प्रतिस्पर्धी आहेत. या दोन्हींच्या किंमती एकसारख्याच आहेत.
follow us on twitter @ DivyamarathiwebX
COMMENT