आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसारमाध्यमांकडून टीम इंडियाचे धिंडवडे! \'कोहलीकडे नेतृत्व सोपवा\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - न्यूझीलंडविरुद्ध क्रिकेट मालिकेत लढाऊवृत्ती न दाखवणार्‍या भारतीय क्रिकेट संघावर न्यूझीलंडमधील प्रसारमाध्यमांनी टीकेचा भडिमार केला. स्थानिक प्रसारमाध्यमांनी टीम इंडियाच्या अब्रूचे धिंडवडेच काढले.
भारतीय संघाने अंगात त्राण नसल्याप्रमाणे खेळ केला. कोणत्याही प्रकारची जिद्द, झुंजार वृत्ती त्यांनी संपूर्ण मालिकेदरम्यान दाखवली नाही. उलट त्यांनी क्षेत्ररक्षणात एवढे झेल सोडले की हा संघ क्रिकेट इतिहासातील सर्वात गचाळ क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हणून गणला जावा. या संघाचे क्षेत्ररक्षण खरोखरच एवढे गचाळ आहे की अन्य काही संशयास्पद गोष्टी घडताहेत, असा सवालही न्यूझीलंडच्या प्रसारमाध्यमांनी उपस्थित केला आहे.
कोहलीकडे नेतृत्व सोपवा : मार्टिन क्रो
भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने संघातील युवा खेळाडू विराट कोहलीकडे आता नेतृत्व सोपवले पाहिजे, असे मत न्यूझीलंडचा माजी खेळाडू मार्टिन क्रोने व्यक्त केले आहे. क्रोच्या मते आता धोनीला विश्रांती दिली पाहिजे. भारतीय संघाचा कसोटी मालिकेत 1-0 ने पराभव झाल्यानंतर क्रोने ही प्रतिक्रिया व्यक्त केली.