आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्णधारपदासाठी धोनीची प्रथम पसंती स्वतःलाच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - महेंद्र सिंह धोनीने टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी पहिली पसंती स्वतःला दिली आहे. तसेच कर्णधारपदाचा वारसदार कोण याचे उत्तर देण्याचे त्याने टाळले आहे.
लेफ्टनंट कर्नल बनलेला धोनी सध्या काश्मिर दौ-यावर आहे. रविवारी त्याने बारामुला जिल्ह्यातील अग्रिम चौकी आणि पाकव्याप्त काश्मिरला देशाशी जोडणारी कमान अमन सेतूचा दौरा केला.
यावेळी धोनीला पुढचा कर्णधार कोण असेल याबद्दल विचारले असता, त्याने कोणाचेही नाव घेतले नाही. तो म्हणाला, तो माझा निर्णय नसतो. माझी पसंती विचाराल तर, मी स्वतःलाच त्या ठिकाणी पाहू इच्छीतो. मात्र, या पदाचे दावेदार अनेक आहेत. आमच्याकडे वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि विराट कोहलीसारखे खेळाडू आहेत.

काश्मिर दौ-यात धोनीने येथील निसर्गसौंदर्याचे तोंडभरून कौतूक केले. तो म्हणाला, काश्मिर भारताचा ताज आहे. अमन सेतू येथे सैनिकांशी त्याने बातचित केली. अहोरात्र देशाचे संरक्षण करण्यासाठी धोनीने त्यांना धन्यवाद दिले.
कसोटी कर्णधारपद स्वीकारण्यास तयार : गंभीर
IPL : या तीन कारणांमुळे गंभीर ठरला धोनीवर भारी