आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahendra Singh Dhoni Sues On Media House For Defamation Of 100 Crore

मॅच फिक्सिंगमध्ये नाव गोवल्या प्रकरणी धोनीचा 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने झी मीडिया व न्यूज नेशन वाहिनीविरुद्ध मद्रास हायकोर्टात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण
धोनीने अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला त्या न्यूज चॅनलवर धोनी मॅच फिक्सिंगमध्ये असल्याचे वृत्त आणि मुलाखत दाखवण्यात आली होती. यामुळे संतप्त झालेल्या धोनीने कोर्टाची पायरी चढली आहे. त्याची मागणी आहे, की त्याच्या संबंधीत सुरु असलेल्या 'त्या' चॅनलवरील बातम्या बंद करण्यात याव्या. कोर्टाने अंतरिम आदेश देत धोनी संबंधीत बातम्यांवर बंदी आणली आहे. मॅच फिक्सिंग मध्ये धोनीच्या सहभागाच्या कोणत्याही बातम्या आणि रिपोर्टस पुढील आदेश मिळेपर्यंत दाखवण्यात येऊ नये असे कोर्टाने म्हटले आहे.
काय म्हणणे आहे धोनीचे
मॅच फिक्सिंगमध्ये त्याच्या सहभागाचे वृत्त त्याने फेटाळले आहे. धोनी म्हणाला, चॅनलवर माझ्या संबंधीत ज्या बातम्या दाखविण्यात येत आहेत त्या खोट्या आणि खोडसाळ आहेत. कोणताही तपास न करता, पुराव्याशिवाय या बातम्या दाखवण्यात येत आहेत. यामुळे माझी आणि टीम इंडियाची बदनामी होत आहे.

पुढील स्लाइडमध्ये, ललित मोदीनेही धोनीला केले होते लक्ष्य