आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahendra Singh Dhoni Surprises Fans With New Hairstyle

धोनीचा हटके अंदाजः बदलली हेअर स्टाईल, चाहत्‍यांना आश्‍चर्याचा धक्‍का

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेद्रसिंह धोनी केवळ त्‍याचे क्रिकेटचे कौशल्‍य आणि कर्णधार म्‍हणून केलेल्‍या कामगिरीमुळेच ओळखला जात नाही. मैदानावर धमाल करणारा धोनी त्‍याच्‍या आगळ्यावेगळ्या हेअर स्‍टाईलमुळेही चर्चेत असतो. सध्‍या चॅम्यिन्‍स लीग टी20 स्‍पर्धेत चेन्‍नई सुपर किंग्‍सचे नेतृत्त्व करणा-या धोनीने पुन्‍हा एकदा हेअर स्‍टाईल चेंज करुन चाहत्‍यांना आश्‍चर्याचा धक्‍का दिला आहे. धोनी कालच्‍या सामन्‍यात मैदानात उतरल्‍यानंतर यष्‍टीरक्षण करताना त्‍याने हेल्‍मेट काढले आणि चाहते थक्‍क झाले, ते त्‍याची हेअर स्‍टाईल पाहून. धोनीने आता 'बाल्‍ड बज कट-मोहॉक' लूकची हेअर स्टाईल केली आहे. डोक्‍यावर मध्‍यभागी मोठे केस आणि दोन्‍ही बाजूला ट्रिमिंग, असा हा अंदाज आहे. इंग्‍लंडचा प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्‍हीड बेकहॅमपासून ही स्टाईल प्रेरित असल्‍याचे जाणवते.

पुढील स्‍लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा धोनीचा वेगवेगळ्या हेअरस्‍टाईल्‍समध्‍ये अनोखा अंदाज...