आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahendra Singh Dhoni Team India In South Africa News Update Hindi

टीम इंडिया पोहोचली दक्षिण अफ्रिकेत, कर्णधार धोनीला यंग ब्रिगेडवर पूर्ण विश्वास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोहन्सबर्ग - वर्षातील सर्वात मोठ्या आव्हानाला तोंड देण्यासाठी टीम इंडिया दक्षिण अफ्रिकेत दाखल झाली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने यंग ब्रिगेड पूर्ण ताकदीने लढेल असा दवा केला आहे. रविवारी दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर जाताना धोनीने आपले इरादे स्पष्ट केले. त्याने दावा केला आहे की, भारतीय फलंदाज डेल स्टेन आणि कंपनीला चोख प्रत्युत्तर देतील.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत अव्वल स्थानावर आहे, तर कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिका. दोन्ही ठिकाणी दुसर्‍या क्रमांकावरही संघांची अशीच परिस्थिती आहे. टीम इंडियाने आतापर्यंत दक्षिण अफ्रिकेत कसोटी किंवा एकदिवसीय मालिका जिंकलेली नाही. मात्र, कर्णधार धोनीने दावा केला आहे की, युवा ब्रिगेड कडवी झुंज देईल. तसेच त्याला विश्वास आहे, की सलग 6 कसोटी विजयाची मानकरी राहिलेली टीम इंडिया नवा इतिहास रचेल.