आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahendrasingh Dhoni Batting Records For India In Test Cricket And Odis

कॅप्टन कूल माही करिअरच्या पहिल्या चेंडूवर झाला होता आऊट, वाचा धोनीचे अनोखे RECORD

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय क्रिकेट संघाचा 'कॅप्टन कूल' अर्थात महेंद्रसिंह धोनीने तडकाफडकी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. धोनीच्या याच्या धक्कादायक निर्णयाचे देशासह संपूर्ण जगात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याशिवाय तर्कवितर्कांनाही उधाण आले आहे.

या पार्श्वभूमीवर आम्ही आपल्या वाचकांसाठी धोनीने केलेल्या अनोख्या विक्रमांविषयी माहिती घेवून आलो आहोत. महेंद्रसिंह धोनी कर्णधार असताना टीम इंडिया 'टी-20 विश्वचषक' आणि 'एकदिवसीय विश्वचषक' विजेता ठरला होता.

टीम इंडिया आणि महेंद्रसिंह धोनीमधील नाते 10 वर्षे जुने आहे. धोनीने टीम इंडियाला कसोटी क्रिकेटच्या क्रमवारी अव्वलस्थान मिळवून दिले होते. यासोबत टीम इंडियाचे नेतृत्त्व करताना धोनीमध्येही अनेक परिवर्तन दिसून आले होते. मात्र, धोनीचा अॅॅटिट्यूड बदलला नाही. धोनी आधीही 'कूल' होता आणि एवढा मोठा निर्णय घेतानाही धोनी 'कूल' दिसत आहे. यामुळेच धोनला 'कॅप्टन कूल' असे संबोधले जात होते.

2004 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण आणि शून्यवर आउट
महेंद्र सिंह धोनीने टीम इंडियाकडून 23 डिसेंबर, 2004 मध्ये श्रीलंकाविरोधात पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. चिटगांव येथील स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात धोनी पहिल्या चेंडूवरच आऊट झाला होता. भारताने हा सामना 11 धावांची जिंकला होता. आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून पहिल्याच चेंडूवर आऊट झालेला धोनी हा भारताचा पहिला आणि जगातील चौथ्या क्रमांकाचा फलंदाज होता. यापूर्वी भारताचा रॉजर बिन्नी हा देखील पदार्पण केलेल्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर आऊट झाला होता.

रोचक रेकॉर्ड्स
> महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने तिन्ही फॉर्मेटमध्ये (वनडे, कसोटी आणि टी-20) सर्वाधिक विजय मिळवला आहे. कसोटीमध्ये 27, वनडेमध्ये 93 आणि टी-20 मध्ये 26 सामन्यात टीम इंडियाने विजय प्राप्त केला आहे.
> 50 पेक्षा जास्त कसोटीत (59) नेतृत्त्व करणारा धोनी हा पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे.
> धोनीच्या नेतृत्त्वात टी-20 मध्ये सर्वाधिक सामने जिंकून टीम इंडियाने विश्व विक्रम केला आहे. टीम इंडियाने 26 सामन्यात विजय नोंदवला होता.
> धोनी हा एक यशस्वी भारतीय विकेटकीपर आहे. कसोटीत 285, वनडेमध्ये 306 आणि टी-20 मध्ये 36 विकेट घेतले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, कॅप्टन कूल धोनीने दहा वर्षांत केलेले विक्रम...