आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसोटीतून महेंद्रसिंग धोनीचे निवृत्तीचे संकेत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कसोटीत निवृत्तीचे संकेत दिले आहे. कसोटीतून निवृत्ती घेण्यासाठी तो आता तयार झाल्याचे दिसून येत आहे. मी लॉर्ड्सवर माझा अखेरचा कसोटी सामना खेळला, असे त्याने स्वत: म्हटले. या संस्मरणीय कसोटीनंतर तो आता येथे खेळताना दिसणार नाही. लॉर्ड्सवर भारताने इंग्लंडला 95 धावांनी मात दिली होती. धोनीने संकेतसुद्धा दिले की तो आता कसोटीपासून दूर राहणार आहे. धोनी सध्या 33 वर्षांचा आहे. पुढची तीन वर्षे आता भारतीय संघ इंग्लंडच्या दौर्‍यावर जाणार नाही. धोनी तोपर्यंत 36 वर्षांचा होईल. आगामी 2015 मध्ये होणार्‍या वनडे वर्ल्डकपवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी कसोटीपासून दूर राहण्याचे त्याने ठरवल्याचे वाटते.