आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahesh Bhupathi And Rohan Bopanna Shown The Door At Madrid

महेश भूपती दहाव्या स्थानी कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचा टेनिस स्टार महेश भूपतीने जागतिक टेनिस क्रमवारीच्या टॉप टेनमधील दहावे स्थान कायम ठेवले. दुसरीकडे लिएंडर पेस व रोहन बोपन्नाची क्रमवारीत घसरण झाली. पेस व ऑस्ट्रियाचा जर्गेन मेलजरला माद्रिद ओपनच्या उपांत्यपूर्व फेरी गाठू शकले नाहीत. यामुळे या जोडीची पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत 15 व्या स्थानावर घसरण झाली. या जोडीचे दोन स्थानांनी नुकसान झाले. बोपन्ना व भूपती ही जोडीदेखील उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात अपयशी ठरली. यामुळे बोपन्नाचे एक स्थानाने नुकसान झाले. त्याची 12 व्या स्थानी घसरण झाली. मात्र, भूपतीने अव्वल दहामधील स्थान कायम ठेवले.

माद्रिद ओपनमध्ये निराशाजनक कामगिरी करणारी सानिया मिर्झा दुहेरीत 16 वे स्थान कायम ठेवण्यात यशस्वी ठरली.

दिविज टॉप-100 मधून बाहेर
भारताचा टेनिसपटू दिविज शरण टॉप-100 मधून बाहेर पडला. त्याची 101 व्या स्थानावर घसरण झाली. एकेरीच्या क्रमवारीत सोमदेवने दोन स्थानांची प्रगती केली. त्याने 187 वे स्थान गाठले. मात्र, युकी भांबरीला पाचवे स्थान गमवावे लागले. तो आता 273 व्या स्थानी आला.