आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahesh Bhupathi Birthday Celebrated In England News In Marathi

B\'DAY:मिस युनिव्हर्स लारा दत्‍ता सोबत \'लव्‍हगेम\' खेळणारा भूपती! बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय टेनिसपटू महेश भूपतीचा आज 40 वा वाढदिवस आहे. भारतीय माध्‍यमांनी या टेनिसपटूविषयी विसर पडला असतानाचा विदेशी माध्‍यमांनी भूपतीवर भरभरुन लिहिले आहे.
अमेरिकेमध्‍ये झाले शिक्षण
भूपतीचा जन्‍म चेन्‍नईमध्‍ये झाला. त्‍याचे विद्यापीठीय शिक्षण अमेरिकेच्‍या मिसिसिपी युनिर्व्‍हसिटीमध्‍ये शिक्षण झाले. भूपतीने वयाच्‍या 21 व्‍या वर्षीच व्‍यावसायिक टेनिस खेळायला सुरुवात केली होती.
पहिला भारतीय
टेनिसमध्‍ये ग्रँडस्‍लॅम विजेता ठरणारा तो पहिला भारतीय टेनिसपटू आहे. 1997 मध्‍ये त्‍याने जपानच्‍या रिका हिराकीसोबत फ्रेंच ओपनचा किताब पटकाविला होता.
1997 पासून आतापर्यंत त्‍याने मिश्र दुहेरी प्रकारात 26 महिला पार्टनर बनविले. त्‍यापैकी जपानच्‍या रिका हिराकी, आई सुगियामी, रशियाच्‍या एलेना लिखोव्त्सेवा, फ्रांसच्‍या मॅरी पियर्स, स्लोवाकियाची डेनिएला हंचुकोवा आणि स्विस स्टार मार्टीना हिंगिससोबत त्‍याने प्रत्‍येकी 1-1 ग्रँड स्‍लम जिंकले. सानिया मिर्झा सोबत त्‍याने मिश्र दुहेरीमध्‍ये दोन ग्रँडस्‍लम जिंकले आहेत.
वैयक्तिक आयुष्‍य
महेश भुपतीने मॉडेल श्‍वेता जयशंकरसोबत विवाह केला. ही जोडी सात वर्षांपेक्षा जास्‍त टिकली नाही. 16 फेब्रुवारी 2011 मध्‍ये भूपतीने बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स लारा दत्‍ता सोबत विवाह केला. दोघांनीही गोव्‍यातील सनसेट पॉईंटवर ख्रिश्‍चन रितीरिवाजाने लग्‍न केले. 20 जानेवारी 2013 रोजी या दांप्‍यत्‍याला एक मुलगी झाली. तिचे नाव सायरा असे ठेवण्‍यात आले.
बिग बी सोबत मॅच
महेश भूपती मुंबईमध्‍ये टेनिस अकादमी चालवितो. 1990 च्‍या दशकात बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्‍चन आणि नसीरुद्दीन शाहसोबत एक चॅरिटी शोचे आयोजन केले होते. त्‍यामध्‍ये बच्‍चन भूपतीचे जोडीदार होते.
पुढील स्‍लाइडवर पाहा, महेश भूपतीचे काही संस्‍मरणीय छायाचित्रे...