आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malaysian Players Who Beat Jwala Gutta And Ashwini Ponappa In Commonwealth Games

जाणून घ्‍या, ज्‍वाला- अश्विनीला पराभूत करणा-या मलेशियन स्‍टारचे फिटनेस सिक्रेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - मलेशिची खीवी वून)
स्‍कॉटलँडमध्‍ये ग्‍लासगो येथे झालेल्‍या 20 व्‍या राष्‍ट्रकुल स्‍पर्धेमध्‍ये भाराताच्‍या ज्‍वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्‍पाला मलेशियन जोडी खीवी वुन आणि विवियन हुका मून यांनी पराभूत केले. दोन वर्षांपूर्वी वुनचे करिअर पायाच्‍या दुखापतीमुळे धोक्‍यात आले होते. परंतु तिच्‍या आईच्‍या स्‍पेशल सुप रेसिपीने आणि फिटनेसबद्दल जागरुकतेमुळे तिने झोकात पुनरागमन केले. आणि सुवर्णदकाची कमाई केली.
2012 मध्‍ये झाली होती दुखापतग्रस्‍त
2012 मध्‍ये वून एकलीज टाचेच्‍या दुखापतीमुळे खेळाबाहेर होती. या दुखापतीमुळे तिचे करिअर संपुष्‍टात येण्‍याच्‍या मार्गावर होते. परंतु अशा स्थितीतून तिला सावरण्‍यासाठी तिच्‍या आईने जॅनी ली हिने तिला सावरण्‍याची मदत केली.
एका मुलाखतीदम्‍यान वून ने आपल्‍या फिटनेस सिक्रेटचा खुलासा केला. ती म्‍हणाली, ''आई दररोज माझ्यासाठी सकाळी उठून शकरकंदीच्‍या पानांचे सुप बनवत होती. मला ते सुप मला अजिबात आवडत नव्‍हते परंतु आईच्‍या सांगण्‍यावरुन मी घेत होती. आईने दिलेल्‍या सुपामुळेच मी राष्‍ट्रकुल स्‍पर्धेत मी खेळू शकले''

वूनला मिळालेले पुरस्‍कार
007 एशियन जूनियर चॅम्पियनशिप- 2 सुवर्ण पदक (मिश्र दुहेरी आणि मिश्र टीम इव्‍हेंट)
2010 एशियन चॅम्पियनशिप- रौप्‍य पदक (महिला दुहेरी)
2010 राष्‍ट्रकुल - सुवर्ण पदक (मिश्र टीम)
2014 राष्‍ट्रकुल - 2 सुवर्ण पदक (मिश्र टीम आणि महिला दुहेरी)
वून आणि तिची सहकारी विवियन क्‍वालालंपूरच्‍या 'यूनिवर्सिटी ऑफ माल्या' मधून पदवीधर आहेत. बॅडमिंटनच्‍या जागतिक नामांकनामध्‍ये ही जोडी 18 व्‍या स्‍थानी आहे.

विवियनने 2010 मध्‍ये झालेल्‍या दिल्‍ली गेम्‍समध्‍ये रौप्‍यपदक पटाकावले होते.
पुढील स्‍लाइडवर पाहा, मलेशियाच्‍या गोल्डन गर्लचे निवडक छायाचित्रे...