आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maleshiya Open Super Series Badminton: Saina, Sindhu In Final Sixteen

मलेशियन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन: सायना, सिंधू अंतिम सोळात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर - प्रदीर्घ कालावधीपासून किताबाच्या प्रतीक्षेत असलेली भारताची नंबर वन बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी मलेशियन सुपर सिरीज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. या विजयासह दोघी प्री क्वार्टर फायनलमध्ये पोहोचल्या आहेत.
आठवी मानांकित सायना नेहवालने इंडोनेशियाच्या हेरा देसीला एकतर्फी लढतीत अवघ्या 36 मिनिटांत 21-10, 21-16 ने हरवले. बिगरमानांकित पी.व्ही. सिंधूने इंडोनेशियाच्याच लिंडावेनी फेनेत्रीला 43 मिनिटे चाललेल्या संघर्षपूर्ण लढतीत 21-17, 21-18 ने हरवले.
सायनाची 16-8 ची आघाडी
पहिल्या गेमच्या सुरुवातीला दहा गुणांपर्यंत संघर्ष केल्यानंतर सायनाने पुढचे सहा गुण सलगरीत्या मिळवत 16-8 ने मजबूत आघाडी घेतली. यानंतर तिने 16-10च्या स्कोअरनंतर सलग पाच गुण मिळवत 21-10 ने पहिला गेम जिंकला.
पुन्हा आघाडी घेतली
दुस-या गेममध्ये 6-6 अशी बरोबरी असताना सायनाने सलग चार गुणांची आघाडी घेत स्कोअर 10-6 असा केला. सायनाने 14-12च्या स्कोअरवर पाच गुणांची कमाई करत 19-12 असा स्कोअर केला आणि नंतर 21-16ने गेम तसेच सामना जिंकला.
आता लढत जुई याओसोबत
जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या सायनाचा प्री क्वार्टर फायनलमध्ये चीनच्या जुई याओसोबत सामना होईल. चीनची खेळाडू सध्या जागतिक क्रमवारीत 30 व्या क्रमांकावर असून तिचा आणि सायनाचा यापूर्वी कधीही सामना झालेला नाही.
आनंद पवारचा पराभव
पुरुष गटात भारताच्या आनंद पवारचा चीनच्या झेंगमिन वांगकडून 33 मिनिटांत 12-21, 11-21 अशा फरकाने पराभव झाला.
सिंधूचा संघर्षपूर्ण विजय
विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक विजेती सिंधूला पहिल्या फेरीच्या विजयासाठी घाम गाळावा लागला. सिंधूने पहिल्या गेममध्ये 10-7 ने आघाडी घेतली. नंतर फेनेत्रीने सलग सहा गुण मिळवत 13-10 असा स्कोअर केला. सिंधूने 15-15 अशी बरोबरी केली. नंतर सलग गुण मिळवत 21-17 ने गेम संपवला. दुस-या गेममध्ये दोन्ही खेळाडू 15-15 पर्यंत बरोबरीत होत्या. दोघींत जबरदस्त सामना रंगला. सिंधूने नंतर सलग चार गुण मिळवत 19-16 असा स्कोअर केला. नंतर तिने 21-18 ने गेम आणि सामना जिंकला. पुढच्या फेरीत सिंधूचा सामना कोरियाची खेळाडू सहावी मानांकित जू इयोनसोबत होईल. दोन्ही खेळाडूंत यापूर्वी एक सामना झाला असून त्यात कोरियाच्या खेळाडूने विजय मिळवला होता.