आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maleshiya Super Series Badminton : Saina Nehwal Defeated In Second Round

मलेशिया सुपर सिरीज बॅडमिंटन: सायना नेहवालवर पुन्हा ‘संक्रांत’,दुस-या फेरीत पराभव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर - लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवालवर पुन्हा एकदा ‘संक्रांत’ आली. यंदा नव्या सत्राला किताबाने सुरुवात करण्याचे तिचे स्वप्न गुरुवारी भंगले. मलेशिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-याच फेरीत भारताची ‘फुलराणी’ सायनाचे आव्हान संपुष्टात आले. तिला चीनच्या खेळाडूने अवघ्या 56 मिनिटांत धूळ चारून बाहेरचा रस्ता दाखवला.
दुसरीकडे जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या सिंधूलाही दुस-या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. यासह भारताचे महिला एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या सायनाला चीनच्या याओ झुईने 16-21, 21-10, 21-19 अशा फरकाने पराभूत केले. सलामी सामन्यातील विजयाने आत्मविश्वास दुणावलेल्या सायनाने पहिल्या गेममध्ये सहज बाजी मारली. मात्र, तिला दुस-या गेममध्ये चीनच्या खेळाडूने रोखले. तिने दुसरा गेम जिंकून लढतीत बरोबरी साधली. त्यानंतर आपल्या चमकदार कामगिरीला कायम ठेवत झुईने निर्णायक तिस-या गेममध्येही बाजी मारून सायनाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. गेल्या वर्षी सायना एकही विजेतेपद जिंकला आले नाही. या वर्षाची सुरुवातही अपयशी ठरली.
गुणांनी हुकली संधी
दुसरा गेम गमावल्यानंतर सायनाने तिस-या निर्णायक गेममध्ये पुनरागमन केले. दोन्ही खेळाडूंनी 19-19 ने बरोबरी साधली. दरम्यान, याओने दोन गुणांच्या आघाडीने लगेच निर्णायक गेममध्ये बाजी मारली.
सिंधूचा अनपेक्षित पराभव
सिंधूला अवघ्या 45 मिनिटांत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. सहाव्या मानांकित येओन जू बाईने सिंधूचा सरळ दोन गेममध्ये 21-16, 21-19 अशा फरकाने पराभव केला.
56 मिनिटांत सायना पराभूत
45 मिनिटांत सिंधूचे स्वप्न भंगले