आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manavjit Shoots Past Olympic Champ Diamond To Win Gold

मानवजितचा ‘सुवर्ण’वेध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्या मानवजितसिंग संधूने शनिवारी आयएसएसएफ शॉटगन वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धेत ‘सुवर्ण’वेध घेतला. त्याने दोन वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन मिचेल डायमंडला पिछाडीवर टाकून ट्रॅप प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले. रशियाचा अ‍ॅलेक्सी एनिलोप कांस्यपदकाचा मानकरी ठरला. ही स्पर्धा अमेरिकेच्या तुस्कॉन येथे सुरू आहे.

जगातील माजी नंबर वन व वर्ल्ड चॅम्पियन मानवजितने अंतिम फेरीत डायमंडविरुद्ध शानदार कामगिरी केली. त्याने पात्रता फेरीत 121 गुण मिळवून फायनलमधील प्रवेश निश्चित केला. त्यानंतर त्याने हा उत्साह कायम ठेवत अंतिम फेरीत बाजी मारली. यातही त्याने उल्लेखनीय कामगिरी करताना 13 गुणांची कमाई केली आणि सुवर्णपदक आपल्या नावे केले. तत्पूर्वी त्याने उपांत्य फेरीत 15 पैकी 14 गुण मिळवले होते. दरम्यान, डायमंडला नऊ गुणांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने शुक्रवारी पात्रता फेरीत 119 गुणांची कमाई करताना अंतिम फेरी गाठली होती.रशियाचा अ‍ॅलेक्सी तिसर्‍या स्थानी राहिला.