आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Manchaster United,real Madrid Team In Semifinal Round

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॅँचेस्टर युनायटेड, रियल माद्रिद संघांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माद्रिद- मॅँचेस्टर युनायटेड व रियल माद्रिदने गुरुवारी चॅम्पियन्स फुटबॉल लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.प्री क्वार्टर फायनलमध्ये मॅँचेस्टर युनायटेड व रियल यांच्यातील लढत 1-1 ने ड्रॉ झाली. मॅँचेस्टर युनायटेडकडून डॅनी वेलबेकने (20 मि.) आणि रियल माद्रिदकडून क्रिस्टियानो रोनाल्डोने (28 मि.) शानदार गोल केले. दोन्ही गोल मध्यंतरापूर्वी झाले. रोनाल्डोने हेडरने गोल करून माद्रिदचा पराभव टाळला.

मॅँचेस्टर युनायटेडने आक्रमक सुरुवात करताना रोनाल्डोच्या टीमविरुद्ध 20 व्या मिनिटाला पहिला गोल केला. फॉरवर्ड डेनी वेलबेकने हेडरने गोल करून युनायटेडला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. मात्र, युनायटेडला ही आघाडी फार काळ राखून ठेवता आली नाही. रियल माद्रिदने पुनरागमन करत अवघ्या आठ मिनिटांत लढतीत बरोबरी मिळवली. क्रिस्टियानो रोनाल्डोने 28 व्या मिनिटाला गोल करून माद्रिदला 1-1 ने बरोबरी मिळवून दिली. त्याने हेडरने हा सुपर गोल केला. दुस-या हाफमध्ये मादिद्रने आघाडी घेण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, युनायटेडच्या गोलरक्षकाने हे प्रयत्न हाणून पाडले. अखेर, ही लढत ड्रॉ झाली. क्रिस्टियानो रोनाल्डो 2003 ते 2009 दरम्यान, मॅँचेस्टर युनायटेडकडून खेळत होता. पोर्तुगालचा रोनाल्डो जगातील सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये सहभागी आहे. 2009 मध्ये रियल माद्रिदने त्याला 9.6 कोटीं युरोमध्ये खरेदी केले.

बोरुसिया - डोनेस्क लढत ड्रॉ
दुसरीकडे लीगमध्ये जर्मन चॅम्पियन बोरुसिया डोर्टमंड व शखतार डोनेस्क यांच्यातील लढत 2-2 ने ड्रॉ झाली.