आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manchester United, Arsenal,new Casal United Victory In English Football Primer

मँचेस्टर युनायटेड, आर्सेनल , न्यू कॅसल युनायटेडचा इंग्लिश फुटबॉल प्रीमियर मध्‍ये विजय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - इंग्लिश फुटबॉल प्रीमियर लीगमध्ये मँचेस्टर युनायटेड, आर्सेनल व न्यू कॅसल युनायटेडने शानदार विजय मिळवले. दुसरीकडे गुणतालिकेत तिस-या स्थानी असलेल्या चेल्सीला पराभवाचा सामना करावा लागला. न्यू कॅसल युनायटेडने चेल्सीला 3-2 अशा फरकाने धूळ चारली.

मँचेस्टर युनायटेड-फुल्हम सामना मध्यंतरापर्यंत 0-0 ने बरोबरीत खेळवला गेला. वायने रुनीने 79 व्या मिनिटाला गोल करून युनायटेडला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. पिछाडीवर पडलेल्या फुल्हामला शेवटपर्यंत लढतीत बरोबरी मिळवता आली नाही. यासह युनायटेडने लीगमध्ये 20 वा विजय मिळवला. गुणतालिकेत सहाव्या स्थानावर असलेल्या आर्सेनलने स्टोक सिटीवर 1-0 ने मात केली. अखेर पोडोलस्कीने 78 व्या मिनिटाला गोल करून आर्सेनलसाठी विजयी कामगिरी केली.

चेल्सीचा धक्कादायक पराभव
चेल्सीला लीगच्या 25 व्या सामन्यात विजय मिळवता आला नाही. सिस्सोकोने शेवटच्या मिनिटाला केलेल्या गोलच्या बळावर न्यू कॅसल युनायटेडने चेल्सीवर 3-2 ने विजय मिळवला.चेल्सीकडून फ्रॅक लॉम्पर्ड (55 मि.) व जुआन माटाने (61 मि.) प्रत्येकी एक गोल केला. मात्र, त्यांना चेल्सीचा पराभव टाळता आला नाही. गुटीइरेझने 41 व्या मिनिटाला न्यू कॅसलला आघाडी मिळवून दिली. मात्र, चेल्सीच्या लॉम्पार्डने गोल करून 55 व्या मिनिटाला लढत 1-1 ने बरोबरीत आणली. जुआन माटाने 61 व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे चेल्सीला 2-1 ने आघाडी घेता आली.