आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mandela's Death Spread Sorrowness In The Sport World

मंडेलांच्या निधनामुळे क्रीडा जगत शोकाकुल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - वर्णभेदाविरुद्ध आयुष्य वेचणा-या नेल्सन मंडेला यांच्या निधनामुळे क्रीडा जगतही शोकाकुल झाले आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती, आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
फिफाने झेंडा अर्ध्यावर उतरवला : आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने मुख्यालयातील झेंडा अर्ध्यापर्यंत उतरवून दुखवटा पाळला. सन 2010 च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना पाहायला मंडेला जातीने हजर होते ही आठवण फिफाने करून दिली आहे. अध्यक्ष सॅप ब्लॅटर यांनी ब्राझीलमध्ये 2014 ची सोडत काढताना एक पत्रक काढून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
आयसीसीलाही दु:ख : नेल्सन मंडेला हे येत्या पिढीसाठी प्रेरणास्रोत बनून राहतील, असे आयसीसी अध्यक्ष इलेन इस्साक आणि सीईओ डेव्हिड रिचर्डसन यांनी म्हटले आहे. मंडेला यांनी आपल्या विचारसरणीबद्दल कधीच तडजोड केली नाही. खेळाचा उपयोग त्यांनी जगाला एकसंध करण्यासाठी आणि लोकांना एकत्र करण्यासाठी केला, असे आयसीसीने म्हटले आहे.
आयओसीची श्रद्धांजली : खेळामुळे मने जुळतात हे ओळखणारे मंडले एकमेवाद्वितीय होते. त्यांच्याच प्रयत्नांमुळे 2010 ची विश्वचषक फुटबॉल स्पर्धा द. आफ्रिकेत होऊ शकली, असे गौरवोद्गार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने काढले आहेत.
द. आफ्रिका-भारत मालिका मंडेला यांना समर्पित
नोबेल पारितोषिक विजेते आणि भारतरत्न नेल्सन मंडेला यांचे निधन झाल्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यादरम्यान खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय मालिकेला ‘स्व. नेल्सन मंडेला यांना समर्पित’ असे नाव देण्यात येत असल्याची घोषणा दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने केली आहे. खेळांप्रती त्यांची आवड 2010 च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतून बघायला मिळते. त्यांच्यामुळे दक्षिण आफ्रिकेत खेळाला चालना मिळाली, अशा शब्दांत संघटनेचे अध्यक्ष ख्रिस नेन्झानी यांनी शोक व्यक्त केला. ही मालिका आम्ही त्यांना समर्पित करीत आहोत. या मालिकेतील सर्व सामने पूर्व नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहेत, अशी माहिती दक्षिण आफ्रिकेच्या क्रीडा मंत्र्यांनी दिली.