आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Big Fight : पॅकियाओ पंचांच्या निर्णयावर नाराज, नव्याने सामन्याची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉक्सिंग फाइटनंतर पत्रकार परिषदेत एकमेकांची गळाभेट घेताना मेवेदर आणि पकयाऊ. - Divya Marathi
बॉक्सिंग फाइटनंतर पत्रकार परिषदेत एकमेकांची गळाभेट घेताना मेवेदर आणि पकयाऊ.
लास वेगास - बॉक्सिंगमध्ये शतकातील सर्वात मोठी फाईट ठरलेल्या सामन्यात मेवेदरकडून पराभूत झाल्यानंतर फिलिपाईन्सचा बॉक्सर मॅनी पॅकियाओने पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत त्याने आपली नाराजी व्यक्त केली. मी त्याला अनेकदा चांगले पंच मारले. मला असे वाटत होते, की मी सामना जिंकला आहे. तो सारखा मागे सरकत होता. विजयाचा विश्वास होता, त्यामुळेच मी अखेरच्या क्षणी फार अटॅक केला नाही. दरम्यान, मेवेदरला विजयी घोषित केल्यानंतर पकयाऊच्या चाहत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ही मॅच पुन्हा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

अखेरच्या क्षणापर्यंत काट्याची टक्कर
अमेरिकेच्या फ्लॉयड मेवेदरने हा सामना जिंकत चॅम्पियनचा किताब राखला असला तरी, ही लढत अगदी शेवटपर्यंत काट्याची टक्कर म्हणावी अशी रंगली. दोघांनाही अखेरच्या क्षणापर्यंत हे समजत नव्हते की, कोण जिंकतंय. वेल्टरवेट (67 किलो) वजनीगटातील हा सामना अगदी बरोबरीचा झाला. ही लढत एवढी रंगली होती की, सामना संपल्यानंतर दोन्ही बॉक्सर्सनी विजेत्याच्या आवेशात उपस्थितांना अभिवादन केले. पण पंचांचा निर्णय मेवेदरच्या बाजुने लागला. दोन पंचांनी त्याला 116-112 च्या फरकाने विजयी घोषित केले. तर तिसऱ्या पंचाने त्याच्या बाजुने 118-110 चा स्कोर दिला. मेवेदरला या विजयासाठी सहा कोटिंचा हिरेजडीत बेल्ट मिळाला. तसेच 1142 कोटींची रक्कमही त्याला मिळाली. पकयाऊला 761 कोटी रुपये मिळाले. मेवेदर जगातील सर्वाधिक कमाई करणारा बॉक्सर आहे. त्याची संपत्ती सुमारे 27 अब्ज रुपये आहे.

सुरुवातीला पॅकियाओने घेतली होती आघाडी
विश्वविजेते पदाच्या या किताबासाठी झालेल्या 12 राऊंडच्या या सामन्यात सुरुवातीला पॅकियाओने आघाडी घेतली होती. त्याने मेवेदरला एकापाठोपाठ पंच देत हैराण केले होते. त्यावेळी बचावासाठी मेवेदर रिंगमध्ये इकडे तिकडे फिरत होता. पण ती त्याची रणनिती होती. त्याचा अखेरच्या क्षणांसाठी ऊर्जा वाचवायची होती. अखेरच्या राऊंडमध्ये त्याने पंचेसनी पकयाऊवर जोरदार अटॅक केला.

इतिहासात माझे नाव लिहिले जाईल-मेवेदर
38 वर्षांचा मेवेदर विजयानंतर म्हणाला की, ‘जेव्हा कधी इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझा उल्लेख नक्की होईल. मी एक चाणाक्ष बॉक्सर आहे. मी पकयाऊचा पराभव केला. आम्हाला काय करायचे आहे हे आम्हाला माहिती होते. तो एक चांगली प्रतिस्पर्धी ठरला. मी पूर्ण वेळ घेतला आणि त्याचे निरीक्षण केले. सप्टेंबरमध्ये मी शेवटचा सामना खेळणार आहे. त्यानंतर 49-0 अशा रेकॉर्डनंतर मी निवृत्ती घेईल असे मेवेदर म्हणाला.
पुढील स्लइडवर पाहा PHOTO