आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्‍यात मनोज तिवारीचे शतक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्‍नई- ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्‍यात पहिल्‍या दिवशी गौतम गंभीरने तडाखेबाज शतक ठोकल्‍यानंतर दुस-या दिवशी मनोज तिवारीनेही शतक केले. काल नाबाद असलेल्‍या तिवारीने 129 धावांची दमदार खेळी केली. त्‍याने 3 षटकार आणि 18 चौकारांनी शतकी खेळी सजविली. तो बाद झाल्‍यानंतर भारत 'अ' संघाचा डाव 451 धावांमध्‍ये संपुष्‍टात आला. ऍश्‍टन ऍगर आणि झेव्हियर डोहर्ती यांनी प्रत्‍येकी 3 बळी घेतले. ऍगरने शेपुट गुंडाळले.

दुस-या दिवसाच्‍या खेळात पावसाने अडथळा आणला. काल रात्री मुसळधार पाऊस पडल्‍यामुळे आज उपहारापर्यंतचा पहिल्‍या सत्रातील खेळ झाला नाही. त्‍यानंतर तिवारीने सावध खेळ करुन शतक पूर्ण केले. भारत 'अ' संघाचा डाव 451 धावांमध्‍ये संपुष्‍टात आल्‍यानंतर ऑस्‍ट्रेलियानेही दमदार प्रत्‍युत्तर दिले. परंतु, जलज सक्‍सेना आणि राकेश ध्रुव या फिरकीपटू जोडीने झटपट धक्‍के देत ऑस्‍ट्रेलियाची 4 बाद 127 अशी अवस्‍था केली. दोघांनीही प्रत्‍येकी दोन बळी घेतले. शेन वॉटसन आणि एड कोवान यांनी शतकी भागीदारी केली. कोवान 116 धावसंख्‍येवर बाद झाला. त्‍यानंतर 3 फलंदाज झटपट बाद झाले. वॉटसनने 84 धावांची आक्रमक खेळी केली. तर कोवान 40 धावा काढून बाद झाला.