आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Manoj Tiwari's Fabulous Centure,jalaj Saxsena Light

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनोज तिवारीचे झुंजार शतक; जलज सक्सेनाही चमकला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - मनोज तिवारीने (129) शतक ठोकून भारत अ संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यात मजबूत स्थितीत पोहोचवले आहे. सराव सामन्याच्या दुस-या दिवशी भारतीय संघाने 451 धावा काढल्या. यानंतर भारतीय खेळाडूंनी अवघ्या 131 धावांवर कांगारूंच्या चार विकेटही घेतल्या.भारताने रविवारी 4 बाद 338 वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. पहिल्या दिवशी नाबाद 77 धावा काढणा-या मनोज तिवारीने दुस-या दिवशीही शानदार खेळी केली. त्याने फक्त शतक ठोकले नाही तर भारताचा स्कोअर 400 च्या पुढे नेला. तो सहाव्या फलंदाजाच्या रूपाने 422 धावांच्या स्कोअरवर बाद झाला. यानंतर आणखी 29 धावा जोडून भारताचा डाव आटोपला.

जलजची अष्टपैलू कामगिरी : मध्य प्रदेशचा ऑफस्पिनर जलज सक्सेनाने अष्टपैलू कामगिरी केली. त्याने सुरुवातीला 30 धावांची नाबाद खेळी केली. यानंतर गोलंदाजीत चमक दाखवताना त्याने 2 गडी बाद केले.

वॉटसनचे अर्धशतक
सलामीवीर शेन वॉटसन (84) आणि एड. कोवान (40) यांनी ऑस्ट्रेलियाला चांगली सलामी दिली. दोघांनी 116 धावांची शतकी भागीदारी केली. कोवानला बाद करून धु्रवने ही भागीदारी मोडली. यानंतर जलजने फिलिप ह्युजला यष्टिचीत केले. शतकाकडे वाटचाल करणा-या वॉटसनला धु्रवनेच बाद केले. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी मॅथ्यू वेड आणि मोईजेज हेन्रिक्स खेळपट्टीवर होते.

वॉर्नरच्या दुखापतीमुळे चिंता वाढली
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा भारताविरुद्ध पहिल्या कसोटीतील सहभाग संदिग्ध मानला जात आहे. येत्या 22 फेब्रुवारीपासून सुरू होणा-या पहिल्या कसोटीपूर्वी वॉर्नरच्या अंगठ्याच्या दुखापतीबाबत चिंता कायम आहे, अशी माहिती ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे प्रमुख जॉन इनवेराटी यांनी दिली. गेल्या काही दिवसांत त्याच्या दुखापतीत सुधारणा झाली आहे. मात्र, तो सराव सामना खेळण्यासाठी फिट नव्हता, असे ते म्हणाले.