आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manojkumar News In Marathi, Divya Marathi, Arjun Award

मनोजला हवा आहे राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - अर्जुन पुरस्काराची लढाई जिंकलेला बॉक्सिंगपटू मनोजकुमारसाठी बुधवारचा दिवस खूप चांगला ठरला. पतियाळाच्या साई केंद्रात आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी रवाना होण्याची तयारी करत असलेल्या मनोजला पुरस्काराबद्दल अभिनंदनाचे संदेश मिळणे सुरू झाले होते. पुरस्काराची लढाई जिंकल्यामुळे मनोज आनंदी तर होता, मात्र मनात नाराजीही होती. "भास्कर'शी बोलताना मनोज म्हणाला, "सर्वांना अर्जुन पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळतो. हा पुरस्कार आयुष्यभराची ठेवण असते. मात्र, मला हा पुरस्कार क्रीडामंत्र्यांच्या हस्ते मिळणार आहे. मला राष्ट्रपती महोदय हा पुरस्कार देणार नाहीत काय,' असा प्रश्न मनोजने अत्यंत भरल्या मनाने विचारला.
विशेष म्हणजे अर्जुन पुरस्कारासाठी मनोजकुमारचे नाव सर्वात पुढे होते. मात्र, साईच्या चुकीचा फटका त्याला बसला. साईच्या एका चुकीमुळे त्याला पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेर करण्यात आले. यानंतर मनोजने िदल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात शासनाच्या वकिलाने सांिगतले की हे प्रकरण पुन्हा पुरस्कार निवड समितीपुढे नेले जाईल. आता तर साईनेच स्पष्ट केले आहे की आिशयाई क्रीडा स्पर्धेनंतर मनोजला अर्जुन पुरस्कार िदला जाणार आहे. मनोजच्या लढाईत लढणारा त्याचा भाऊ राजेशकुमारसुद्धा खूप आनंदी होता. या लढ्यात मनोजला समर्थन देणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो, असे त्याच्या भावाने सांिगतले. बुधवारी मनोजच्या गावात त्याच्या कुटुंबीयांनी आनंद साजरा केला.