आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manojkumar News In Marathi, Khelratna, Divya Marathi

मनोजकुमारला मिळणार अर्जुन पुरस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - ऑलिम्पियन बॉक्सर हरियाणाच्या मनोजकुमारला अखेर अर्जुन पुरस्कार मिळणार आहे. अर्जुन पुरस्कार मिळवण्यासाठी त्याने जोरदार झुंज दिली आणि यात त्याचा विजय झाला. एशियन गेम्सनंतर त्याला एका कार्यक्रमात क्रीडामंत्र्यांकडून पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.

"भास्कर'सोबत बोलताना स्पोर्ट््स अथॉरिटी ऑफ इंिडया अर्थात साईचे प्रमुख जे. आय. जे. आय. थॉमसन यांनी ही मािहती िदली. मनोजला अर्जुन पुरस्कार दिला जाणार आहे. याबाबत मनोजला अिधकृतरीत्या क्रीडा मंत्रालयाकडून सूचित केले जाईल. सध्या एशियन गेम्स असल्यामुळे कार्यक्रम होऊ शकत नाही. यामुळे तो कोिरयाहून परत येताच िदल्लीत एखाद्या छोट्या कार्यक्रमात त्याला सन्मानित केले जाईल. क्रीडामंत्री स्वत: मनोजला हा पुरस्कार देतील, असेही त्यांनी नमूद केले. आिशयाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या बॉिक्संग संघात
सध्या मनोज आहे. तत्पूर्वी, कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीमध्ये मनोजच्या नावामुळे खूप वाद झाला होता.

मनोज कुमारची न्यायालयात धाव
अर्जुन पुरस्कार न िमळाल्याने नाराज झालेल्या मनोजने िदल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अर्जुन पुरस्कारासाठी तयार नियमावलीनुसार आणि गुणप्रक्रियेनुसार मनोजचे ३२ गुण होते, मात्र, अर्जुन पुरस्कार ३० गुण असणारा दुसरा बॉिक्संगपटू जयभगवानला जाहीर झाला. मनोज डोपिंग चाचणीत अडकल्याचे साईचे म्हणणे होते. मात्र, नंतर स्पष्ट झाले की डोप चाचणीत अडकलेला बॉक्सर ऑिलम्पियन मनोज नव्हे, तर याच नावाचा एक शाळकरी मुलगा होता. यानंतर अर्जुन अवॉर्ड समितीची पुन्हा बैठक झाली. यातही मनोजची बाजू
ऐकण्यात आली नाही.