आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटपटू मनप्रीत गोनीने स्वत:च्या आईला जिवे मारण्‍याची दिली धमकी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेटपटू मनप्रीत गोनीवर आपल्‍या आईला जिवे मारण्‍याची धमकी दिल्‍याचा गंभीर आरोप करण्‍यात आला आहे. हे आरोप खुद्द त्‍याच्‍या 70 वर्षीय आईनेच केले आहेत. प्रकरण वादग्रस्‍त संपत्तीशी संबंधित असल्‍याचे सांगण्‍यात येते. इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)मध्‍ये किंग्‍ज इलेव्‍हन पंजाबकडून खेळणा-या गोनीची टीम इंडियामध्‍येही वर्णी लागली होती.

'जर मला आज काही झाले तर त्‍यासाठी गोनी जबाबदार असेल', असे मोहिंदर कौर यांनी म्‍हटले आहे. पोलिसांना सांगूनही काहीच कारवाई होत नसल्‍याचेही त्‍यांनी म्‍हटले आहे.