आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manpreet Singh Captain Of Junior Team For The Sulatan Johar Cup

सुलतान जोहार चषकाकर‍िता मनप्रीत सिंगकडे ज्युनियर हॉकी टीमचे नेतृत्वाची जबाबदारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - येत्या 22 सप्टेंबरपासून तिस-या सुलतान जोहार चषक हॉकी स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेसाठी मिडफिल्डर मनप्रीत सिंगकडे भारतीय ज्युनियर हॉकी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आली आहे. ही स्पर्धा 22 ते 29 सप्टेंबरदरम्यान, मलेशियातील जोहार बहरू येथे होणार आहे. यासाठी हॉकी इंडिया निवड समितीचे बी.पी.गोविंदा, सय्यद अली, डॉ.आर.पी.सिंग आणि प्रशिक्षक ग्रेग क्लार्क, बलजित सिंग सैनी यांनी मंगळवारी 18 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली.


अफान युसूफची भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी वर्णी लागली. मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये हॉकी संघाचे सराव शिबिर आयोजित केले आहे.


भारतीय हॉकी संघ : गोलरक्षक : हरजोत सिंग, सुशांत तिर्की. डिफेंडर : अमित रोहिदास, जरमनप्रीत सिंग, कोथाजित सिंग, सुरिंदर कुमार, सुखमनजीत सिंग, प्रदीप मोर. मिडफिल्डर : मनप्रीत सिंग (कर्णधार), प्रधदीप सिंग, हरजित सिंग, सतबीर सिंग, इमरान खान. फॉरवर्ड : मनदीप सिंग, अमोन मिराश तिर्की, मोहंमद आमीर खान, तलविंदर सिंग, अफान युसूफ (उपकर्णधार).