आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सध्या IPL गाजवतेय, \'ही पोली साजुक तुपातली...\' फेम शिबानी दांडेकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिबानी दांडेकर. - Divya Marathi
शिबानी दांडेकर.
म्युझिक, अॅक्टींग, अँकरींग, मॉडेलिंग अशा ग्लॅमरच्या जगतात चौफेर कामगिरी करणारी मूळची पूणेकर असणारी शिबानी दांडेकर ही सध्या आयपीएलमध्ये सेलिब्रिटींसह चाहत्यांचीही मने जिंकत आहे. शिबानीने 2011 मध्ये आयपीएलमध्ये अँकरींगला सुरुवात केली होती. तेव्हापासून दरवर्षी भारताच्या या क्रीडा उत्सवात ती क्रिकेटच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी समर्थपणे पेलत आहे. त्याशिवाय चित्रपटसृष्टीच्या ग्लॅमवर्ल्डमध्येही तिची चलती आहे. गेल्यावर्षी सुपरहिट ठरलेल्या टाईमपास या मराठी चित्रपटातील तिच्या ही पोली साजूक तुपातली... या आयटम नंबरने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं.

पुण्यातीत चित्पावन ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या शिबानी दांडेकर ही ऑस्ट्रेलियामध्ये लहानाची मोठी झाली. तिच्या दोन बहिणींप्रमाणेच शिबानीला गायन आणि अभिनयाची आवड होती. त्यामुळेच दोन बहिणींसोबत मिळून तिने डी मेजर हा म्युझिक बँड सुरू
केला. पण याबरोबरच तिचा कल अँकरींगकडेदेखिल होता. त्यामुळेच ती करिअरची वाट शोधण्यासाठी अमेरिकेला गेली. याठिकाणी तिच्या अँकरिंग करिअरला वेग आला. 2011 मध्ये ती आयपीएलमध्ये सूत्रसंचालन करू लागली. इतर वाहिन्यांवरील कार्यक्रमांचे सूसंचालनही तीने केले आहे. त्याचबरोबर मॉडेलिंगमध्येही तिचे काम सुरुच असते. हे सर्व करत असताना गायनाची आवड जोपासत त्या क्षेत्रातही काहीतरी करत राहायचे हा तिचा प्रयत्न असतोच. त्याचबरोबर ती आता हळूहळू चित्रपटसृष्टीतही प्रवेश करू लागली आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या रॉय चित्रपटातही तिने एक भूमिका केली होती.
शिबानीचे करिअर
- पुण्यात जन्म, ऑस्ट्रेलियात लहानाची मोठी झाली
- बहिणींसोबत डी मेजर हा म्युझिक बँड सुरू
केला
- करिअरसाठी 2001 मध्ये अमेरिकेला रवाना
- करिअरची सुरुवात अमेरिकेत टिव्ही शोच्या अँकरींगने
- अमेरिकेत विविध शोसाठी अँकरिंग केले.
- नमस्ते अमेरिका, व्ही देसी आणि एशियन व्हरायटी शो अशा शोचे होस्टींग
- बॉलीवूडच्या मोठ्या स्टार्सला या शोद्वारे अमेरिकेत बोलावले जात होते.
- शाहरूख खान बरोबर एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले.
- भारतात परतल्यानंतर काही टिव्ही शो होस्ट केले
- सोबत मॉडेलिंग आणि गायनही केले
- झलक दिखला जा मध्ये स्पर्धक
- 2011 पासून आयपीएलमध्ये एक्स्ट्रा इनिंग
- चित्रपटात आयटम साँगही केले.
- टाईमपासमधील ही पोली साजूक तुपातली... या गाण्याला विशेष पसंती
- रॉय चित्रपटात झोयाची भूमिका
पुढील स्लाइड्सवर पाहा, शिबानीचे PHOTO...