आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडन- सरावादरम्यान झालेल्या रेसिंग कारच्या अपघातामध्ये स्पेनची मारिया डे विल्लोटाने उजवा डोळा गमावला आहे. दोन दिवसांपूर्वी हा अपघात घडला होता.
कॅम्ब्रिज येथील अँडेनब्रुक रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचार सुरू आहे. फॉर्म्युला-1 रेसिंग कारची स्टार ड्रायव्हर म्हणून तिची ओळख आहे. 'या भीषण अपघातामधून मारिया वाचवल्यामुळे आम्ही देवाचे आभार मानतो. मात्र, तिचा एक डोळा निकामी झाल्याचे दु:ख आहे. सध्या तिची प्रकृती चांगली आहे,' अशी माहिती संघाचे प्रशिक्षक जॉन बुथ यांनी दिली. मात्र, रुग्णालयाच्या सूत्रांनी मारियाची तब्येत चिंताजनक असल्याचे सांगितले. तिला पूर्ववत येण्यामध्ये बराच वेळ लागणार आहे. उपचारासाठी तज्ज्ञ वैद्यकीय पथक प्रयत्नशील आहे. मारिया ही माजी स्पेनचे प्रसिद्ध फॉर्म्युला-1 ड्रायव्हर यांची मुलगी आहे. 2001 मधील स्पॉनिश एफ-3 या स्पर्धेतून तिने फॉर्म्युला-1 रेसिंग कार स्पर्धेतून करिअरला सुरुवात केली होती.
'मारिया पूर्णपणे बरी होईल, अशी मला आशा आहे. देव तिला दीर्घ आयुष्य देवो,' अशी प्रतिक्रिया टेनिसपटू राफेल नदालने व्यक्त केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.