आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेरेना-शारापोवा यांच्यात रंगणार फायनल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माद्रिद- अव्वल मानांकित सेरेना विल्यम्स आणि मारिया शारापोवा यांच्यात माद्रिद ओपनची फायनल होईल. महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी या दोघी समोरासमोर असतील. अमेरिकेच्या सेरेनाने उपांत्य सामन्यात इटलीच्या सारा इराणीला सरळ दोन सेटमध्ये 7-5, 6-2 अशा फरकाने पराभूत केले. यासह तिने अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. दुसर्‍या मानांकित शारापोवाने सर्बियाच्या अ‍ॅना इव्हानोविकवर 6-4, 6-3 ने विजय मिळवला. अंतिम सामन्यातील विजयाने सेरेनाला करिअरमध्ये विजेतेपदाचे अर्धशतक पूर्ण करता येणार आहे. दुसरीकडे फायनलमधील विजयाने शारापोवाला क्रमवारीत अव्वल स्थान गाठण्याची संधी आहे.