लंडन - विम्ब्लडन ओपन टेनिस स्पर्धा काही दिवसांवर येवून ठेपली आहे. गेल्यावेळी ही स्पर्धा दिग्गज खेळाडूंच्या घसरण्यामुळे चांगलीच गाजली होती. त्यामध्ये शारापोवाचासुध्दा समावेश होता. यावेळी तिचे पाय कोर्टवर स्थिरावे हीच तिच्या चाहत्यांची इच्छा आहे.
वयाच्या 17 वर्षी विम्ब्लडन चा किताब जिंकणारी मारिया शारापोव्हा लाखो चाहत्यांच्या गळयातील ताईत बनली आहे. नुकतीच तिने मियामी ओपन स्पर्धाही जिंकली आहे. त्यामुळे यावर्षीच्या विम्ब्लडन ओपनचे तिला प्रबळ दावेदार मानले जात आहे.
लंडनमधील हिरव्या गार गवताच्या टेनिसकोर्टवर प्रत्येक खेळाडूंची खेळण्याची इच्छा असते. किंबहूणा स्वप्न असते.
सर्वांत श्रीमंत महिला टेनिसपटू
फोर्ब्सद्वारा प्रकाशित केलेल्या सर्वांत श्रीमंत महिला खेळाडूमध्ये तिचा अव्वल क्रमांक आहे. 2013 मध्ये तिने 27.1 मिलिडयन डॉलर(163.4 कोटी रुपये) ची कमाई केली होती.
(फोटोओळ- दि. 26 जून 2013 मध्ये टेनिसकोर्टवर पाय घसरल्यामुळे शारापोव्हाला बाहेर पडावे लागले होते.)
पुढील स्लाइडवर पाहा, मारिया शारापोव्हाने गेल्या 10 वर्षांमध्ये विम्ब्लडन वर केलेल्या कामगिरीविषयी..