आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maria Sharapova Bold Avtaar Before French Open Tennis Tournament

FRENCH OPEN: ग्रँड स्‍लॅमपूर्वीच रशियन सुंदरीने दाखवला जलवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस- रशियन टेनिस स्‍टार मारिया शारापोव्‍हा सध्‍या फ्रेंच ओपनच्‍या तयारीमध्‍ये व्‍यग्र आहे. माद्रिद ओपनमध्‍ये सलग सामने जिंकून मारियाने आपण फॉर्मात असल्‍याचे दाखवून दिले. आपल्‍या या कामगिरीने तिने सेरेना विल्यिम्‍ससारख्‍या दिग्‍गज खेळाडूंना धोक्‍याचा इशारा दिला आहे.

टेनिस कोर्टबरोबरच मारिया फॅशन मॅगझीनमध्‍ये हॉट फोटोशूट देण्‍यावरून असो किंवा आपल्‍या बॉयफ्रेंडबरोबर वॉकला जाण्‍यावरून ती प्रत्‍येकठिकाणी चर्चेत आहे. नुकताच मारियाने 'एस्‍क्‍वायर मेक्सिको' मॅगझीनच्‍या मेसाठीच्‍या अंकासाठी फोटोशूट केले आहे. या सेक्‍सी फोटोशूटमध्‍ये मारियाने स्किन कलरचा बॉडीसूट घालून आपला फिटनेस दाखवला आहे.

फोटोशूटनंतर तिची वेळ होती कोर्टवर कमाल दाखवण्‍याची. माद्रिद ओपनमध्‍ये अनेक अडचणींवर मात करीत मारिया टुर्नामेंटच्‍या उपउपांत्‍य फेरीपर्यंत पोहोचली आहे. तिथे तिचा सामना एस्‍टोनियाच्‍या काईया कनेपीशी होणार आहे.

मारियाच्‍या या सुपरमूडपाठीमागे तिचा बॉयफ्रेंड ग्रिगर दिमित्रिवचा मोठा हात आहे. शारापोव्‍हा ग्रिगरसाठीही लकी चार्म सिद्ध झाली आहे. माद्रिद ओपनदरम्‍यान ग्रिगोव्‍हने नंबर एकचा खेळाडू नोव्‍हाक जोकोविचला पराभूत केले होते.

माद्रिदमध्‍ये शारापोव्‍हा आणि ग्रिगोव्‍ह एकमेकांचा हात हातात घालून रोमँटिक वॉक करताना नजरेस पडले. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा, मारिया शारापोव्‍हाचा बिन्‍धास्‍त बोल्‍ड अंदाज...