आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maria Sharapova Crashes Out Of Australian Open 2014

सेरेना विल्यम्सनंतर रशियाची मारिया शारापोव्‍हाही ऑस्‍ट्रेलियन ओपनमध्‍ये पराभूत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न- ऑस्‍ट्रेलियन ओपन टेनिस स्‍पर्धेमध्‍ये सेरेना विल्‍यम्‍सला पराभव पत्‍करावा लागला होता. त्‍यापाठोपाठ रशियाची स्‍टार टेनिसपटू मारिया शारोपोव्‍हा हिलासुध्‍दा हार पत्‍करावी लागली. चौथ्या फेरीमध्‍ये मारियाला स्‍लोवाकियाच्‍या डोमिनिका सिंबुलकोवाकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. तीन सेटमध्‍ये चाललेल्‍या प्रदीर्घ लढतीमध्‍ये डोमिनिका सिबुलकोवाने शारापोव्‍हाचा 3-6, 6-4, 6-1 अशा गुणांनी पराभव केला.

सेरेनाच्‍या पराभवानंतर जागतिक क्रमवारीत 2 -या स्‍थानी असलेली शारापोव्‍हा पहिल्‍या क्रमांकाची प्रबळ दावेदार मानली जात होती. परंतु आज झालेल्‍या लढतीमध्‍ये तिने चाहत्‍यांना दुख:द धक्‍का दिला.

पहिला सेट शारापोव्‍हाने 6-3 असा जिंकला होता. मात्र जागतिक मानांकनात 24 व्‍या स्‍थानी असलेल्‍या सिंबुलकोवाने जोरदार पुनरागमन करत दुस-या सेटमध्‍ये बरोबरी साधली.

तिस-या निर्णायक सेटमध्‍ये सिंबुलकोवाने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत 6-1 अशा गुणांनी सेट आपल्‍या खात्‍यावर जमा केला. शारापोव्‍हाला 77 गुण होते तर सिंबुलकोवाला 87 गूण होते.

पुढील स्‍लाइडवर पाहा, ऑस्‍ट्रेलियन ओपन टेनिसस्‍पर्धेमधील शारापोव्‍हा आणि सिंबुलकोवाची छायाचित्रे...