आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maria Sharapova Poses With French Open Trophy She Celebrates Her Victory Latest News In Marathi

PICS: फ्रेंच ओपन किताब जिंकताच \'लावण्यवती\' टेनिसपटू शारापोव्हाने केला जल्‍लोष !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - नाजूक सौँदर्य, कमनीय बांधा, प्रत्येक स्पर्धेगणिक बदलणारे डिझायनर कपडे या गोष्टींसाठी प्रसिद्ध लावण्यवती टेनिसपटू मारिया शारापोव्हाने टेनिस विश्वातील सगळ्यात कठीण अशा फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले.
जगातील माजी नंबर वन मारिया शारापोवा शनिवारी फ्रेंच ओपनच्या महिला गटात चॅम्पियन ठरली. तिने दुसर्‍यांदा महिला एकेरीचा किताब पटकावला. यापूर्वी तिने 2012 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. सातव्या मानांकित मारिया शारापोवाने शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात रोमानियाच्या नंबर वन सिमोना हालेपचा पराभव केला. तिने 6-4, 6-7, 6-4 अशा फरकाने विजय मिळवला. यासह तिने 3 तास 2 मिनिटांमध्ये अजिंक्यपदावर नाव कोरले. तिने एक ऐस आणि 20 विनर्स मारून सामना जिंकला.
तीन वर्षांनंतर मिळवले यश
रशियाची 27 वर्षीय खेळाडू मारिया शारापोवाने तीन वर्षांनंतर दुसर्‍यांदा फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. यासह तिने करिअरमधील पाचवा ग्रँडस्लॅम आपल्या नावे केला. तिने पहिला ग्रँडस्लॅम वयाच्या 17व्या वर्षी पटकावला होता. यापूर्वी तिने 2012 मध्ये पहिल्यांदा फ्रेंच ओपनच्या किताबावर नाव कोरले होते. मात्र, त्यानंतर तिला 2013 च्या फायनलमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
हालेपचे स्वप्न भंगले
हालेपचे 22 व्या वर्षी फ्रेंच ओपनचा किताब जिंकण्याचे स्वप्न भंगले. तिने प्रथमच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. यासह ती 34 वर्षांनंतर फायनल गाठणारी रोमानियाची पहिली खेळाडू ठरली होती.
पुढील स्‍लाइडवर पाहा, शारापोवाचे संस्‍मरणीय छायाचित्रे...