आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maria Sharapova Wins The French Open In A Three set Thriller

लाल मातीची सम्राज्ञी : शारापोवाने दुसर्‍यांदा जिंकला एकेरीचा किताब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - जगातील माजी नंबर वन मारिया शारापोवा शनिवारी फ्रेंच ओपनच्या महिला गटात चॅम्पियन ठरली. तिने दुसर्‍यांदा महिला एकेरीचा किताब पटकावला. यापूर्वी तिने 2012 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. सातव्या मानांकित मारिया शारापोवाने शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात रोमानियाच्या नंबर वन सिमोना हालेपचा पराभव केला. तिने 6-4, 6-7, 6-4 अशा फरकाने विजय मिळवला. यासह तिने 3 तास 2 मिनिटांमध्ये अजिंक्यपदावर नाव कोरले. तिने एक ऐस आणि 20 विनर्स मारून सामना जिंकला.

शारापोवाने दमदार सुरुवात करताना पहिल्या सेटमध्ये 6-4 ने बाजी मारली. मात्र, यासाठी तिला 57 मिनिटांची झुंज द्यावी लागली. त्यानंतर मात्र दुसर्‍या सेटमध्ये तिचा प्रयत्न फसला. या वेळी 72 मिनिटे रंगलेल्या दुसर्‍या सेटमध्ये चौथ्या मानांकित हालेपने यश संपादन केले. तिने टायब्रेकरपर्यंत रंगलेला सेट 7-6 ने जिंकून लढतीत बरोबरी साधली. त्यानंतर तिसर्‍या आणि निर्णायक सेटमध्ये दोन्ही तुल्यबळ खेळाडूंची झुंज रंगली होती. मात्र, 53 मिनिटांत शारापोवाने सेट जिंकून हालेपला पराभवाची धूळ चारली. यासह तिने विजेतेपद आपल्या नावे केले.

तीन वर्षांनंतर मिळवले यश
रशियाची 27 वर्षीय खेळाडू मारिया शारापोवाने तीन वर्षांनंतर दुसर्‍यांदा फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. यासह तिने करिअरमधील पाचवा ग्रँडस्लॅम आपल्या नावे केला. तिने पहिला ग्रँडस्लॅम वयाच्या 17व्या वर्षी पटकावला होता. यापूर्वी तिने 2012 मध्ये पहिल्यांदा फ्रेंच ओपनच्या किताबावर नाव कोरले होते. मात्र, त्यानंतर तिला 2013 च्या फायनलमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

हालेपचे स्वप्न भंगले
हालेपचे 22 व्या वर्षी फ्रेंच ओपनचा किताब जिंकण्याचे स्वप्न भंगले. तिने प्रथमच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. यासह ती 34 वर्षांनंतर फायनल गाठणारी रोमानियाची पहिली खेळाडू ठरली होती.