आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारा इराणीला हरवून शारापोवा अंतिम चारमध्ये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मियामी - जागतिक क्रमवारीतील दुस-या क्रमांकाची खेळाडू रशियाच्या मारिया शारापोवाने इटलीच्या सारा इराणीला उपांत्यपूर्व फेरीत 7-5, 7-5 ने पराभूत केले. या विजयासह तिने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. उपांत्य फेरीत तिचा सामना येलेना यांकोविचशी होईल. तिसरी मानांकित शारापोवाला सातवी मानांकित सारासमोर सहज विजय मिळवता आला नाही. दुस-या सेटमध्ये 4-5 ने मागे पडल्यानंतर दोन तास आणि 29 मिनिटे रंगलेल्या लढतीत तिने अखेरचे तीन गेम आणि सेट पॉइंटसह सेमीफायनलमध्ये जागा निश्चित केली. इतर एका उपांत्यपूर्व सामन्यात येलेना यांकोविचने रॉबर्टो विंचीला 6-4, 6-7, 6-3 ने हरवले.


डेव्हिड फेररची आगेकूच
पुरुष गटात जागतिक क्रमवारीतील पाचव्या क्रमांकाचा खेळाडू स्पेनच्या डेव्हिड फेररने मियामी मास्टर्सच्या पुरुष एकेरीतील उपांत्यपूर्व सामन्यात ऑस्ट्रियाच्या जुर्गेन मेल्जरला 4-6, 6-3, 6-0 ने हरवले. आता उपांत्य सामन्यात फेररचा सामना टॉमी हॅससोबत होईल. हॅसने उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सचा अकरावा मानांकित जाइल्स सिमोनला 6-3, 6-1 ने मात देत सेमीफायनल प्रवेश केला.


स्पर्धेतील निकाल- शारापोवा वि.वि. सारा (7-5, 7-5)
येलेना यांकोविच वि.वि. विंची ( 6-4, 6-7, 6-3)
डेव्हिड फेरर वि.वि. जुर्गेन मेल्जर ( 4-6, 6-3, 6-0 )
टॉमी हॅस वि.वि. जाइल्स सिमोन ( 6-3, 6-1 )