आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marion Bartoli Routs Sabine Lisicki To Win First Wimbledon Title

मरियन बार्तोली विम्बल्डनची राणी !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - विम्बल्डन टेनिस स्पध्रेतील महिलांच्या अंतिम सामन्यात फ्रान्सच्या मरियन बार्तोलीने विजेतेपद जिंकले आहे. र्जमनीच्या सबिना लिसिकीला पराभूत करून बार्तोली आता विम्बल्डनची नवी राणी ठरली आहे.

अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीतील 15 व्या क्रमांकाची खेळाडू बार्तोलीने 24 व्या क्रमांकाच्या लिसिकीला 6-1, 6-4 असे सरळ दोन सेटमध्ये हरवले. बार्तोलीने हा सामना एक तास आणि 21 मिनिटांत जिंकला.

सेरेना विल्यम्स सारख्या तगड्या खेळाडूला पराभूत करणारी लिसिकी फायनलमध्येही धक्कादायक कामगिरी करते काय, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, बार्तोलीने दमदार प्रदर्शन करून बाजी मारली. बार्तोलीने सामन्यात 6 ऐस आणि 21 विनर्स मारुन ग्रँडस्लॅम जिंकले. तिचे करियरमधील हे पहिले ग्रॅण्डस्लॅम ठरले.

योकोविक-मुरे झुंज आज
रविवारी पुरुष गटात फायनल होणार असून, सर्बियाचा नोवाक योकोविक आणि इंग्लंडचा मुरे या वेळी समोरासमोर असतील.