आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TRAGEDY: एका चेंडूने घेतला क्रिकेटपटूचा जीव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेटमुळे खेळाडूला पैसा आणि प्रसिद्धी मोठयाप्रमाणात मिळते. पण त्‍याचबरोबर या खेळात त्‍याच्‍या जीवाला धोकादेखील मोठया प्रमाणात असतो. दक्षिण आफ्रिकेचा यष्‍टीरक्षक मार्क बाऊचर नुकताच अशाच एका घटनेतून थोडक्‍यात बचावला. एका सराव सामन्‍यात यष्‍टीरक्षण करताना चेंडूमुळे उडालेली बेल्‍स त्‍याच्‍या डाव्‍या डोळयाच्‍या कोप-याला लागल्‍यामुळे तो जायबंदी झाला. या जखमेमुळे अखेर बाऊचरला आपल्‍या क्रिकेट जीवनाला निरोप द्यावा लागला.
मार्क बाऊचरचे नशीब चांगले की तो फक्‍त जायबंदी झाला. जर बेल्‍स दुसरीकडे लागली असतीतर तर त्‍याचा डोळाच निकामी झाला असता. 14 वर्षांपूर्वी म्‍हणजे 23 फेब्रुवारी 1998रोजी भारतीय क्रिकेट इतिहासात एक दुर्दैवी घटना घडली होती. उत्तर प्रदेशचा क्रिकेटपटू रमन लांबाचा शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करताना चेंडू डोक्‍याला लागल्‍यामुळे मृत्‍यू झाला होता.
क्रिकेटच्‍या इतिहासातील या सर्वात दुर्दैवी मृत्‍यूविषयी जाणून घेऊ यात...