आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Marria Sharapova Rischest Lady Player In The World

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कमाईत शारापोवा नंबर वन महिला खेळाडू !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सुप्रसिद्ध व्यक्तींच्या कमाईचा लेखाजोखा ठेवणारे मॅगझीन फोब्र्जने सर्वाधिक कमाई करणार्‍या महिला खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या यादीत रशियन टेनिसपटू मारिया शारापोवा नंबर वनची महिला खेळाडू ठरली आहे. ही यादी निश्चितच धक्का देणारी आहे. कारण, जागतिक क्रमवारीत नंबर वन असलेली आणि शारापोवापेक्षा अधिक विजेतेपद मिळवूनही सेरेना विल्यम्स कमाईच्या बाबत दुसर्‍या क्रमांकावर आहे, तर 2012 पासून एकही ग्रँडस्लॅम जिंकू न शकणारी शारापोवा कमाईत आघाडीवर आहे.

फोब्र्जच्या यादीनुसार जून 2012 ते 2013 या काळात शारापोवाने 2.90 कोटी डॉलर (जवळपास 1.76 अब्ज रुपये) कमाई केली. या यादीत अनेक अशा महिला खेळाडूही आहेत, ज्यांनी गुणवत्तेपेक्षा सौंदर्याच्या बळावर आघाडी मिळवली आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांची कमाई खूप कमी आहे.

अमेरिकन टेनिस स्टार व जगातील नंबर वन सेरेना विल्यम्स 2.50 कोटी डॉलरसह (1.24 कोटी अब्ज रुपये) दुसर्‍या क्रमांकावर तर चीनची ली ना 1.82 कोटी डॉलरसह (जवळपास 1.10 अब्ज रुपये) तिसर्‍या स्थानी आहे. चीनची लीना महिला एकेरीत ग्रँडस्लॅम जिंकणारी तिच्या देशाची पहिली खेळाडू ठरली होती. तिच्याकडे सॅमसंग, नाईके आणि र्मसिडिझसारखे ब्रँड आहेत. बेलारूसची व्हिक्टोरिया अझारेंका 1.57 कोटी डॉलरसह (95.42 कोटी रुपये) चौथ्या क्रमांकावर आहे. या वेळी अझारेंका नाईके, विल्सन, अमेरिकन एक्स्प्रेस आणि रेड बुलसारख्या कंपन्यांची जाहिरात करते.

डेन्मार्कची कॅरोलीन वोज्नियाकी 1.36 कोटी डॉलर (82.66 कोटी रुपये) सह सातव्या, पोलंडची एग्निजस्का रंदवास्का 74 लाख डॉलर (44.97 कोटी रुपये) आठव्या, सर्बियाचा अँना इवानोविक 70 लाख डॉलरसह (42.54 कोटी रुपये) नवव्या क्रमांकावर आहे.


जाहिरातीतून 2.30 कोटी डॉलरची कमाई
फोब्र्जच्या यादीनुसार गेल्या काही वर्षांपासून टेनिसमध्ये महिलांनासुद्धा पुरुषांच्या बरोबरीने बक्षीस रक्कम देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. ग्रँडस्लॅम जिंकल्यानंतर मिळणार्‍या जाहिरातीद्वारे खेळाडूंची अधिक कमाई होते. शारापोवाने फ्रेंच ओपन जिंकल्यानंतर जाहिरातीतून प्रचंड कमाई केली. तिने हेड, नाईकी तसेच इतर ब्रँडच्या जाहिरातीतून 2.30 कोटी डॉलर (1.39 अब्ज रुपये) कमवले. याशिवाय तिने स्वत:चे ब्रँड शुगरपोवासुद्धा लाँच केले.

टॉपटेनमध्ये तीन इतर खेळाच्या खेळाडू
अमेरिकेची नासकार ड्रायव्हर डानिका पॅट्रिक 1.50 कोटी डॉलरसह (91.17 कोटी रुपये) पाचव्या स्थानी, दक्षिण कोरियाची फिगर स्केटिंगची खेळाडू किम युना 1.40 कोटी डॉलरसह (85.09 कोटी) सहाव्या तर अमेरिकन गोल्फपटू पॉला किमर 55 लाख डॉलर (33.42 कोटी रुपये) दहाव्या क्रमांकावर आहे.


अब्ज रुपयांची शारापोवाने जून 2012 ते 2013 या काळात कमाई केली.
हेही आहे खास
0 टायगर वूड्स जगात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे. एका वर्षात त्याने 4.74 अब्ज रुपये कमवले.
0 सर्वाधिक कमाई करणार्‍या मारिया शारापोवाची एका वर्षाची कमाई 1.76 अब्ज रुपये आहे. ही रक्कम वूड्सच्या रकमेपेक्षा 2.96 अब्जाने कमी आहे.
0 शारापोवा 1.39 अब्ज रुपये फक्त जाहिरातीच्या माध्यमाने कमवते.
0 सर्वाधिक कमाई करणार्‍या टॉप टेन महिला खेळाडूंत सात टेनिसपटूंचा समावेश आहे.
0 सर्वाधिक कमाई करणार्‍या 100 खेळाडूंच्या यादीत फक्त तीन महिला खेळाडू आहेत.