आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marriage Of Accused In IPL Spot Fixing Ankeet Chavan

PHOTOS: स्‍पॉट फिक्सिंगमध्‍ये अडकलेला अंकित चव्‍हाण \'लग्‍नाच्‍या बेडीत\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एकीकडे जावई गुरूनाथ मयप्‍पन यांच्‍यामुळे बीसीसीआयचे अध्‍यक्ष एन. श्रीनिवासन यांच्‍यासमोरील अडचणी वाढत चालले आहेत. त्‍यातच आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांनीही त्‍यांच्‍यावर ट्विटरच्‍या माध्‍यमातून शरसंधान केले आहे. या सर्वांमध्‍ये आणखी एक घटना घडतेय ती म्‍हणजे, स्‍पॉट फिक्सिंगमध्‍ये अडकलेल्‍या अंकित चव्‍हाणचे आज (रविवार) लग्‍न होते.

आपली महाविद्यालयीन मैत्रिण नेहा सांबरीबरोबर त्‍याचे लग्‍न झाले. दादर येथील साने गुरूजी विद्यालयामध्‍ये अंकितचे लग्‍न होते. शाळेचा आठवा मजला अंकित आणि नेहाच्‍या लग्‍नासाठी सजवण्‍यात आला होता. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा लग्‍नाच्‍या तयारीचे फोटो...