आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Martin Guptill Wants New Zealand To Play More Test Matches

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्‍यूझीलंडने जास्तीत जास्त कसोटी खेळावेत: मार्टिन गुप्टिल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेलिंग्टन- आंतरराष्ट्रीय क्रमवारीत झेप घ्यायची असेल तर जास्तीत कसोटी सामने खेळावे लागतील, असा सल्ला फलंदाज मार्टिन गुप्टिलने गुरुवारी न्यूझीलंड क्रिकेटला दिला. खराब कामगिरीमुळे किंवींचा संघ तळाला आठव्या क्रमांकावर आहे. नुकत्याच संपलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (सीपीएल) गुप्टिलने शानदार कामगिरी केली. या मालिकेत 33 च्या सरासरीने त्याने 198 धावा काढल्या होत्या. सर रिचर्ड हेडली यांनीही न्यूझीलंड बोर्डाला असाच अधिकाधिक कसोटी सामने खेळण्याचा सल्ला दिला होता.