आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्ण कामगिरी करणा-या नितीश, कडूबाळचा गौरव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पुणे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय फिला ट्रेडिशनल रेसलिंग कमिटी मल्टी चॅम्पियनशिप स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी केली. मास रेसलिंग व बेल्ट रेसलिंग क्रीडा प्रकारात 60 किलो वजन गटात नितीश काबलीये आणि 90 किलो गटात कडूबाळ चोपडेने सुवर्णपदक पटकावले. त्यांच्या या यशाबद्दल खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले. याप्रसंगी शरद कचरे, गणू पांडे, डॉ. फुलचंद सलामपुरे, ज्ञानेश्वर जाधव यांची उपस्थिती होती.