आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या पडद्यावर मास्टर ब्लास्टर नव्या अवतारात !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आता सचिन तेंडुलकर टेलिव्हिजनवर पहिल्यांदा अ‍ॅनिमेटड रूपात दिसेल. एखादा भारतीय क्रिकेटपटू अथवा कोणताही खेळाडू अ‍ॅनिमेटेड रूपात टेलिव्हिजनवर चाहत्यांसमोर येण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ ठरेल. या मालिकेत सचिन अंतरिक्ष यानासारख्या स्टेडियममध्ये क्रिकेट शिकवताना दिसेल. हे मैदान अत्याधुनिक तंत्राने पूर्ण तर असेलच शिवाय हवेत उडून जगात कुठेही जाण्यात हे सक्षम असेल.


शेमारू एंटरटेनमेंट लिमिटेडकडून तयार होणा-या या कॉमिक आणि रोमांचक मालिकेत ‘मास्टर-ब्लास्टर’ मध्ये सचिन अ‍ॅनिमेटेड भूमिकेत झळकेल. या मालिकेचे एकूण 28 एपिसोड तयार केले जातील. प्रत्येक एपिसोड 22 मिनिटांचा असेल. यात सचिन जगभरातील निवडक युवा खेळाडूंना क्रिकेटचे गुण शिकवताना दिसेल.
प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल ट्रेनिंग आॅफ यंग क्रिकेटर्सने (पिच) उदयोन्मुख खेळाडूंना प्रशिक्षक देण्यासाठी आयोजित शिबिरात सचिनची निवड प्रशिक्षक म्हणून केली. या मालिकेत सचिन तेंडुलकरच्या शिबिराविरुद्ध दुसरा क्रिकेट स्टार पीटर नावाच्या विरोधकाचेही शिबिर दाखवले जाईल. कोणत्याही परिस्थितीत सचिन आणि त्याच्या शिबिरातील खेळाडूंना मात देण्याचा प्रयत्न पीटर करेल.


उत्साहित आहे : सचिन
अ‍ॅनिमेशनच्या जगताने मला नेहमी आकर्षित केले आहे. माझ्या मुलांसोबत नेहमी याचा आनंद लुटतो. या अ‍ॅनिमेटेड सिरीजमुळे मी खूपच उत्साहित झालो आहे. स्वत:ला अ‍ॅनिमेटेड भूमिकेत बघण्याचा अनुभव वेगळाच असेल. वास्तविक जीवनापासून दूर असलेल्या अ‍ॅनिमेटेड जगात स्वत:ला नवे प्रयोग करताना पाहणे खरोखर वेगळा अनुभव असेल.