आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅलेक स्टिवर्टच्या ड्रीम टीममध्ये मास्टर-ब्लास्टर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - इंग्लंडचा माजी कर्णधार अ‍ॅलेक स्टिवर्टच्या ड्रीम टीममध्ये एकमेव भारतीय खेळाडूच्या रूपात मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने स्थान मिळवले आहे. स्टिवर्ट ज्या खेळाडूंविरुद्ध खेळला, त्या अनुभवावरून त्याने आपली ड्रीम टीम तयार केली आहे.याबाबत माहिती देताना स्टिवर्ट म्हणाला, ‘आपल्या इतक्या मोठ्या क्रिकेट कारकीर्दीत सचिनने फक्त धावांचा डोंगर उभा केला नाही, तर त्याने या काळात अत्यंत दबावाचा सामनासुद्धा केला. असे असतानासुद्धा तो भारतीय क्रिकेटचा आदर्श बनला, हे शानदार आहे.’


सचिनची संस्मरणीय खेळी
स्टिवर्टने या वेळी सचिनच्या शानदार खेळीची आठवण केली. 1993 मध्ये मुंबईत सचिनने 165 धावांची दमदार खेळी केली होती. ही खेळी माझ्या स्मरणातून जात नाही.याशिवाय त्याने हेडिंग्ले येथे 193 धावांची प्रेक्षणीय खेळी केली होती. सचिन मैदानावर ज्या वेळी पूर्ण लयीत असतो, त्या वेळी त्याला खेळताना बघून त्याची बॅट जणूकाही
हळूहळू मोठी होत आहे, असा भास होतो. सचिनची फलंदाजी आजही माझ्या स्मरणात आहे, असे तो म्हणाला


द्रविड, कुंबळेसुद्धा होते शर्यतीत
स्टिवर्टने या ड्रीम टीमच्या निवडीसाठी सुरुवातीला सचिनशिवाय इतर दोन भारतीय राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांची सुद्धा निवड केली होती. मात्र, या दोघांना अंतिम अकरा खेळाडूंत स्थान मिळाले नाही. माझ्या शानदार कारकीर्दीत माझा अनेक दिग्गज खेळाडूंशी सामना झाला. या सर्वांतून अकरा खेळाडू निवडणे सोपे काम नव्हते, असे स्टिवर्ट म्हणाला.


ड्रीम टीम अशी
स्टीव्ह वॉ (कर्णधार), सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, गॉर्डन ग्रिनिज, कर्टली अ‍ॅम्ब्रोज, माल्कम मार्शल, अ‍ॅडम गिलख्रिस्ट, शेन वॉर्न, मॅथ्यू हेडन, वसीम अक्रम, जॅक कॅलिस.