» Master Blaster Sachin Tendulkar Answers Critics With His Bat

वनडे निवृत्तीनंतर पहिल्या लढतीत सचिनचे शतक

वृत्तसंस्था | Jan 07, 2013, 04:20 AM IST

  • वनडे निवृत्तीनंतर पहिल्या लढतीत सचिनचे शतक

मुंबई - सलामीवीर वसीम जाफरच्या नाबाद 137 आणि मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 108 धावांच्या शानदार शतकामुळे मुंबईने बडोद्याविरुद्ध रणजी करंडक उपांत्यपूर्व सामन्याच्या पहिल्या दिवशी 3 बाद 272 धावा ठोकल्या.
आंतरराष्ट्रीय वनडेमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन आपला पहिला सामना खेळत आहे. या लढतीत सचिनने 233 चेंडूंचा सामना करताना 10 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 108 धावा काढून आपल्यात अजूनही धावांची भूक कायम असल्याचे यावेळी सर्वांना दाखवून दिले.

मुंबईचा दुसरा सलामीवीर वसीम जाफरने 256 चेंडूंचा सामना करताना 16 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 138 धावा काढल्या. तो अजूनही खेळपट्टीवर कायम आहे. मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांच्या दोन विकेट अवघ्या 35 धावांत तंबूत परतल्या.

यानंतर वसीम जाफर आणि सचिन तेंडुलकर यांनी तिस-या विकेटसाठी 234 धावांची भागीदारी करून मुंबईचा डाव सावरला. आपले शतक पूर्ण केल्यानंतर दिवसाचा खेळ संपायला काही षटके शिल्लक असताना सचिन बाद झाला. बडोद्याकडून मुर्तुजा वोहराने सचिनला त्रिफळाचीत केले.

Next Article

Recommended