आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Master Blaster Sachin Tendulkar Comment On Richard

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठवणी क्रिकेटच्या: रिचर्ड्ससोबत खेळता न आल्याची सचिनला खंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मला त्या त्या कालखंडांतील सर्वोत्तम खेळाडूंसोबत खेळण्याची संधी दिली. मात्र, माझा लाइफटाइम हीरो व्हिव्हियन रिचर्ड्ससोबत खेळण्याची संधी मला मिळाली नाही याची खंत कायम वाटत राहील, असे मनोगत सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.

1992च्या विश्वचषक स्पर्धेत एक उदयोन्मुख क्रिकेटपटू म्हणून पदार्पण करणारा सचिन तेंडुलकर आज क्रिकेट विश्वातील एक दिग्गज खेळाडू बनला आहे. आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासाच्या गत आठवणीतील काही रोमहर्षक गोष्टी सचिनने आयसीसीच्या आगामी विश्वचषक स्पर्धेच्या प्रसिद्धी मोहिमेच्या अंतर्गत सांगितल्या.

1987 च्या भारतातील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ‘बॉलबॉय’ च्या स्वरूपात विश्वचषकाच्या वातावरणात आलेला सचिन तेंडुलकर त्यांनंतर या स्पर्धेचा एक प्रमुख आकर्षक खेळाडू बनला.

‘ऑस्ट्रेलियातील विश्वचषकात प्रत्येक संघात एकापेक्षा एक महान खेळाडू होते. इंग्लंडकडे इयान बोथम, ग्रॅहम गूच, अ‍ॅलन लँब होते. दक्षिण आफ्रिकेत केपलर वेसल, पीटर कर्स्टन. पाकिस्तानकडे इम्रान खान, जावेद मियांदाद, वसीम अक्रम. विंडीजकडे डेसमंड हेन्स, रिची रिचर्डसन, माल्कम मार्शल, कर्टली अ‍ॅम्ब्रोज होते. त्या संघात सर व्हिव्हियन रिचर्ड्स नसल्यामुळे मी फार निराश झालो होतो. आजही माझा हीरो व्हिव्हियन रिचर्ड्स हाच आहे. अशा महान खेळाडूशी खेळता आले नाही ही खंत कायम वाटत राहील. ऑस्ट्रेलियाकडे अ‍ॅलन बॉर्डर, स्टीव्ह व मार्क वॉ, क्रेझ मॅकडरमॉट होते. न्यूझीलंडकडे मार्टिन क्रो, जॉन राइट होते; तर श्रीलंकेने अरविंद डिसिल्व्हा, अर्जुना रणतुंगा यांच्यासारखे खेळाडू आणले होते’ असे सचिनने आठवणी सांगताना नमूद केले.

सुदैवी...
हॅडली, माल्कम मार्शल, कपिलदेव, इम्रान खान, इयान बोथम या जगातील सर्वोत्तम ऑल राउंडर्ससोबत खेळल्याबद्दल सचिनने स्वत:ला सुदैवी मानले आहे.

1992 मध्ये सचिनचा पहिला वर्ल्डकप
1992 चा विश्वचषक सचिनसाठी पहिलावहिला विश्वचषक होता. त्या स्पर्धेत 47 च्या सरासरीने त्याने 283 धावा काढल्या. त्या विश्वचषकातील भारताने दोनच सामने जिंकले. त्या दोन्ही (पाकिस्तान व झिम्बाब्वे) सामन्यांचा सामनावीर सचिन होता. 463 एकदिवसीय सामने खेळून निवृत्ती स्वीकारलेल्या सचिनला 2015 चा विश्वचषक सतत खुणावत राहणार आहे.