आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Match Fixing Case: BCCI Failed To Defend Mayappan

मॅच फिक्सिंग प्रकरण: मयप्पनच्या बचावासाठी बीसीसीआयचा \'डाव\' उलटाच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मॅच फिक्सिंग प्रकरणातून श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन यांना वाचवण्याचा बीसीसीआयचा ‘डाव’ उलटाच पडत आहे. गुरुनाथ निर्दोष नसल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे असून ते कोर्टात सादर केले जातील, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.


दुसरीकडे, केंद्र सरकार व क्रीडा सचिवांनीही बोर्डाचा चौकशी अहवाल फेटाळला आहे. बीसीसीआयने रविवारी मयप्पन व राजस्थान रॉयल्सचे सहमालक राज कुंद्रा यांना क्लीन चिट दिली होती.
मुंबई पोलिसांनी सहकार्य केले नसल्याचा आरोप बीसीसीआयच्या चौकशी समितीने केला होता. त्याला उत्तर म्हणून सोमवारी मुंबई क्राइम ब्रँचचे सहआयुक्त हिमांशू राय यांनी तपासात सहकार्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगितले. एखाद्या गुन्हेगारी प्रकरणाचा तपास करत असलेला पोलिस खात्याचा अधिकारी सीआरपीसी कायद्यानुसार फक्त कोर्टालाच उत्तरदायी असू शकतो. मयप्पनविरुद्ध पोलिसांकडे स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीचे सबळ पुरावे आहेत. पोलिसांच्या या खुलाशानंतर बीसीसीआयचा तपास संशयाच्या घेºयात सापडला आहे. पोलिसांनी तपासात सहकार्य करावे, असे बोर्डाचे पत्र दोन आठवड्यांपूर्वी मिळाल्याचे राय यांनी सांगितले.


28 जून रोजी मुंबई पोलिसांना बोर्डाचे पत्र
प्रति, कमिश्नर ऑफ पोलिस, मुंबई
तुमचा विभाग गुरुनाथ मयप्पनविरुद्ध चौकशी करत आहे. आम्ही दोन माजी न्यायाधीशांची एक समिती प्रस्थापित केली आहे. आमची विनंती आहे की, तुमच्याकडून एक तपास अधिकारी आम्हाला सहकार्य करण्यासाठी नियुक्त केला जावा. अधिकारी दस्तऐवजांसह 7 जुलै रोजी बंगळुरूतील हॉटेल आयटीसी गार्डनियामध्ये उपस्थित राहावा.
आर.एस. शेट्टी, जीएम
गेम डेव्हलपमेंट, बीसीसीआय

बोर्डाला 5 जुलैला मुंबई पोलिसांना उत्तर :
प्रति, आर.एस. शेट्टी,
जीएम, गेम डेव्हलपमेंट
बीसीसीआय
तुम्हाला विदित आहेच की, मुंबई क्राइम ब्रँचने या प्रकरणात विविध कलमांतर्गत गुरुनाथ मयप्पन आणि इतर 15 आरोपींना अटक केलेले आहे. आमच्या विभागाकडून तुमच्या तपासाच्या सहकार्यासाठी एक तपास अधिकारी नियुक्त करण्याचा उल्लेख तुमच्या पत्रात आहे. कृपया तुम्ही आधी स्पष्ट करावे की, कोणता वैधानिक तरतुदीनुसार तुमची तपास समिती पोलिस खात्याच्या अधिकाºयाला दस्तऐवजांसह उपस्थित राहण्यास सांगत आहे.
- हिमांशू राय, सहआयुक्त, मुंबई क्राइम ब्रँच
(या पत्रानंतर बीसीसीआयकडून मुंबई पोलिसांना कोणतेही पत्र पाठवले गेले नाही. दोनच आठवड्यांत बीसीसीआयच्या तपास अहवालात मयप्पन आणि राज कुंद्रा यांना क्लिन चिट देण्यात आली.)


उपस्थित होणारे प्रश्न
1 तपास अधिकाºयांनी तपासात सहकार्यच केले नाही तर मयप्पन आणि कुंद्रा यांना क्लीन चिट कशाच्या आधारावर दिली?
2 मंडळाच्याच लाचलुचपत विभागाचा अहवाल आलेला नाही, मग घाईघाईत चौकशीची घोषणा का केली?
3 पोलिसांनी मदत न केल्यानंतर दोन आठवड्यांत चौकशी कोणी केली आणि अहवाल कोणत्या कागदपत्रांच्या आधारे तयार करण्यात आला ?
4 बीसीसीआयच्या क्लीन चिटचा अर्थ काय?


बीसीसीआयने सूर बदलला
पोलिस व केंद्राने फटकारताच बोर्डाच्या अहवालाचे समर्थन करणारे मंडळाचे उपाध्यक्ष शहा यांनी सूरच बदलला...
आधी म्हटले : आम्ही पोलिसांच्या चौकशीवर अवलंबून राहू शकत नाही. आमच्यासाठी चौकशी समितीचा अहवालच अंतिम आहे. मग तो काहीही असो.
नंतर म्हणाले : जर मुंबई पोलिसांच्या चौकशीमध्ये गुरुनाथ मयप्पन आणि राज कुंद्रा दोषी आढळले तर मंडळाकडून पुन्हा त्यांची चौकशी केली जाईल.
आता शंका : जर पुन्हा कारवाईची चर्चा सुरू असेल तर बीसीसीआयच्या चौकशीला काही अर्थ नाही. म्हणजेच या चौकशीत काहीतरी स्वार्थ होता.